October 29, 2024 12:38 PM October 29, 2024 12:38 PM

views 13

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत एकता दौडचं आयोजन

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आज एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला आयोजित केली जाणारी ही एकता दौड यावर्षी दिवाळीमुळे दोन दिवस आधीच म्हणजे आज घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या एकता दौडीला हिरवा झेंडा दाखवला. एकता दौड ही देशाच्या एकतेसाठीच नाही, तर विकसित भारताचा संकल्प देखील असल्याचं शहा यावेळी म्हणाले.  केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

September 30, 2024 12:59 PM September 30, 2024 12:59 PM

views 10

काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचं प्रधानमंत्र्यांबद्दलचं वक्तव्य अशोभनीय – मंत्री अमित शाह

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जम्मू काश्मीरमध्ये प्रचारसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अशोभनीय असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. यातून काँग्रेस नेत्यांचा मोदींविषयीचा तिरस्कार आणि भिती दिसते असं शाह म्हणाले. मल्लिकार्जुन खरगे काल जम्मू काश्मीरमधल्या जसरोटा इथल्या प्रचारसभेला संबोधित करताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, काही वेळ विश्राम केल्यानंतर खरगे यांनी आपलं भाषण पुन्हा सुरू केलं आणि प्रधानमंत्री मोदी यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिव...

September 16, 2024 8:03 PM September 16, 2024 8:03 PM

views 10

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकारनं गाडून टाकले – गृहमंत्री अमित शहा

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकारनं गाडून टाकले आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. किश्तवरमधल्या पड्डेर - नागसेनी मतदारसंघात सुनिल शर्मा यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहिरनाम्यात दहशतवाद्यांना मुक्त करण्याचा उल्लेख आहे असा आरोप शहा यांनी केला. सरकार स्थापन केल्यानंतर ३७० कलम पुनर्स्थापित करू, असं वचन काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने दिलं आहे.  त्यामुळे त्यांना पहाडी, गुज्जर आणि इतरांचं आरक...

September 15, 2024 2:58 PM September 15, 2024 2:58 PM

views 11

एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढण्याची गरज – गृहमंत्री अमित शहा

दहशतवाद विरोधातली संरचना बळकट करण्यासाठी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्था आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेत बोलत होते.   जम्मू-काश्मीर, कट्टर डावी विचारसरणी आणि  आणि ईशान्य भारतातील राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समस्या सोडवण्याच्या अनुषंगानं झालेल्या प्रगतीबद्दल तसंच माओवादा विरोधातल्या प्रयत्नांमध्ये यश मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक...

September 13, 2024 6:35 PM September 13, 2024 6:35 PM

views 12

उद्यापासून नवी दिल्लीत चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला आरंभ

चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उद्यापासून आरंभ होत असून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित या हीरक महोत्सवी विशेष सोहळ्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एक विशेष टपाल तिकिट आणि नाणं प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राजभाषा विभागांतर्गत भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन तसंच अनेक पुस्तकं आणि मासिकांचं  प्रकाशन करण्यात येणार आहे.   केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजभाषा दिनानिमित्तचा विशेष संदेश उद्या सकाळी सात व...

September 8, 2024 1:22 PM September 8, 2024 1:22 PM

views 10

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू शकतील – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू शकतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मूमध्ये काल भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर योग्यवेळी जम्मू-काश्मीला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल असं आपण स्वतः संसदेत ऑगस्ट 2019 मध्ये आश्वासन दिलं होतं, असंही ते म्हणाले. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं ती ऐतिहासिक असल्याचंही अमित शाह म्हणाले.

September 7, 2024 7:43 PM September 7, 2024 7:43 PM

views 11

जम्‍मू काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

विधानसभा निवडणुकीनंतर जम्‍मू काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल, असं आश्‍वासन भाजपचे वरिष्‍ठ नेता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिलं. ते  जम्‍मूमध्ये जाहीर प्रचार सभेत बोलत होते.  आगामी विधानसभा निवडणूक ऐतिहासिक असल्याचं ते म्हणाले. कलम ३७० हटवल्यानंतर जम्‍मू काश्‍मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. काँग्रेस - नॅशनल कॉन्फरेन्स आघाडी जुनी व्‍यवस्‍था पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच जम्‍मू कश्‍मीरला पुन्हा दहशतवादाच्या खाईत लोटण्याचा या आघाडीचा डाव ...