April 6, 2025 9:52 AM

views 22

३१ मार्चपूर्वी देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल – गृहमंत्री अमित शाह

३१ मार्च २०२६ पूर्वी छत्तीसगडसह संपूर्ण देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं आढावा बैठकीत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगताना कोणत्याही परिस्थितीत नक्षलविरोधी मोहिमेची गती कमी होणार नसल्याचं शहा यावेळी म्हणाले.

April 5, 2025 8:08 PM

views 13

छत्तीसगडमधला नक्षलवाद पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत संपवण्याचा सरकारचा संकल्प-गृहमंत्री

छत्तीसगडमधला नक्षलवाद पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत संपवण्याचा संकल्प सरकारनं केला असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री शहा आज त्यांच्या छत्तीसगड दौऱ्यादरम्यान बस्तर जिल्ह्यात दंतेवाडा इथल्या बस्तर उत्सवाच्या समारोप समारंभाला उपस्थित होते. माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्तीसगडच्या आदिवासी कला आणि हस्तकला यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी बस्तर पांडुमचं कौतुक केलं. या तीन दिवसीय उत्सवात आदिवासी नृत्य, लोकगीत, आदिवासी नाटक, व...

April 2, 2025 8:24 PM

views 25

वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम सदस्यांची नेमणूक करणार नसल्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा निर्वाळा

वक्फ बोर्डावर एकही बिगर मुस्लिम सदस्याची नियुक्ती करणार नसल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत दिला. मुस्लिमांची धार्मिक वागणूक आणि त्यांनी दान केलेल्या संपत्तीमध्ये हे विधेयक कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. अल्पसंख्यक मतदारांमध्ये भिती निर्माण करण्यासाठी गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

March 30, 2025 8:43 PM

views 16

केंद्रीय  गृहमंत्र्यांच्या हस्ते बिहारमधे विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन

केंद्रीय  गृह मंत्री अमित शाह यांनी आज बिहारमधे सुमारे आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन केलं. सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या १११ कोटी रुपये खर्चाच्या आणि नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीतल्या ४२१ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. पोलिसांसाठी च्या सदनिकांचं तसंच ३ महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाची कोनशिला त्यांनी बसवली.   दरभंगा इथल्या मच्छिमार सहकारी संस्थेत मखाणा प्रक्रीया उद्योगाचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीने केलं. बि...

March 29, 2025 3:50 PM

views 16

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मणिपूरमधे शांतता प्रस्थापित झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

मणिपूरमधे योग्य वेळी राष्ट्रपती राजवट लावण्यात  आली असून राज्य आधीपेक्षा जास्त शांत झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. काल रात्री एका माध्यम संस्थेच्या परिषदेला ते संबोधित करत होते. राज्यात शांतता कायम करण्याच्या दृष्टीने सरकार मैतेई आणि कुकी समुदायाशी चर्चा करत आहे. सकारात्मक गोष्टी घडत असून चिंता करण्याचं कारण नाही असं गृहमंत्री म्हणाले. मणिपूरला वांशिक हिंसाचार  नवीन नसून याआधीही असा हिंसाचार तीन ते चार वर्षे झाला आहे, असं गृहमंत्री म्हणाले.    दरम्यान, गृहमंत्री अमित श...

March 16, 2025 1:34 PM

views 18

भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री शाह यांची बैठक

भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज ईशान्येकडच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. दिवसाच्या सुरुवातीला ते कोक्राझार इथं ऑल बोडो स्टुडन्ट्स युनियनच्या ५७ व्या वार्षिक परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर ते दुपारी गुवाहाटीला पोहोचतील. तिथे ते आसाम, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. मणिपूरमधे राष्ट्रपती शासन लागू असल्याने तिथून बैठकीला कोण उपस्थित राहणार हे अद्या...

March 14, 2025 1:33 PM

views 15

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ईशान्येकडच्या राज्यांच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री ईशान्य भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. शनिवारी सकाळी, आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात देरगाव इथं नूतनीकृत पोलिस अकादमीचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते होईल, यावेळी दुसऱ्या टप्प्याच्या ४२५ कोटी ४८ लाख रुपयांच्या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभही होणार आहे.    यानंतर, शहा मिझोरामला रवाना होतील, तिथं ते आसाम रायफल्सच्या स्थलांतराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. आसाम रायफल्सचं स्थलांतर राज्याच्या आइझॉल या राजधानीपासून सुमारे १५ किमी अंतरावर झोखॉस...

March 2, 2025 4:48 PM

views 14

अंमली पदार्थांच्या तस्करांना कडक शासन करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध-गृहमंत्री

देशभरातल्या वेगवेगळ्या १२ प्रकरणातल्या २९ अंमली पदार्थ तस्करांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. देशात वरपासून खालपर्यंत चालवण्यात आलेल्या शोध मोहीमेत या सर्वांना पकडण्यात आलं होतं. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे देशातल्या युवकांचे आयुष्य खराब होत असल्यानं अंमली पदार्थांच्या तस्करांना कडक शासन करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.

March 1, 2025 8:03 PM

views 18

मणिपूरमधे ८ मार्चपासून सर्वांना मुक्तपणे वावरता येण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश

मणिपूरमधे येत्या ८ मार्च पासून सर्व रस्त्यांवर सर्वांना मुक्तपणे वावरता यावं याची काळजी घेण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिले. मणिपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.   रस्त्यांवर वाहतुकीला अडथळे आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसंच मणिपूरमधल्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीलगत कुंपण घालण्याचं काम लौकरात लौकर पूर्ण करावं असं त्यांनी सांगितलं. मणिपूरला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर ...

January 25, 2025 3:41 PM

views 16

व्हायब्रंट गावांमध्ये यावर्षीच्या जून अखेरीपर्यंत फोर-जी सुविधा उपलब्ध करणार- अमित शाह

केंद्र सरकारच्या व्हायब्रंट व्हिलेज या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या  360 पेक्षा जास्त व्हायब्रंट गावांमध्ये, यावर्षी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत फोर जी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या एका कार्यक्रमात व्हायब्रंट गांवांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गच्या 662 गावांपैकी 474 गावांमध्ये ऑन-ग्रीड आणि 127 गावांमध्ये ऑफ-ग्रीड पद्धतीनं विद्युतीकरण केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. य...