May 28, 2025 1:10 PM

views 20

महाराष्ट्रात पावासाचा जोर कायम

महाराष्ट्रात गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात तीन, जालना दोन तर मुंबई, रायगड आणि अहिल्यानगर मध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत देण्याचे आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळा बैठकीत दिले आहेत.    दरम्यान, महाराष्ट्रातल पावसाळ्याची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. लातूरमध्ये तीन ...

May 26, 2025 3:41 PM

views 23

मुंबईसह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस

महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि झारखंडमधे सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होत आहे.   महाराष्ट्रात मोसमी पावसाचं आगमन  नेहमीच्या वेळेच्या १० दिवस आधीच झालं असून कोकणात सर्वत्र तसंच सोलापूर, सांगली इत्यादी ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे.   राजधानी मुंबईत कालपासून वादळी पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. सकाळी कार्यालयात...

May 26, 2025 1:39 PM

views 16

देशातल्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

नैऋत्य मोसमी पावसानं आज मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, बेंगळुरूसह कर्नाटक, तमिळनाडूचे उर्वरित भाग, तेलंगण आणि आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापला. तसंच मिझोराम, आसाम आणि मेघालयाचा काही भाग आणि संपूर्ण त्रिपुरा, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातही नैऋत्य मोसमी पाऊस सक्रीय झाला. मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेशाचे आणखी काही भाग, तसंच कर्नाटकाच्या उर्वरित भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाला पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.    कर...

May 26, 2025 10:29 AM

views 11

राज्यात जोरदार पावसाची हजेरी

महाराष्ट्राच्या विविध भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस काल दक्षिण कोकणात दाखल झाला असून, तो यावर्षी नेहमीपेक्षा 10 दिवस आधीच राज्यात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आगामी दोन दिवस पावसाचे असले तरी 27 मे पासून पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होईल; मे महिन्याच्या शेवटी कोकण वगळता बहुतांश भागात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे पावसाची अपेक्षा करून शेतकऱ्यांनी कोरडवाहू जमिनीवर पेरणी आणि लागवडीची घाई ...

May 25, 2025 3:51 PM

views 16

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे, तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड, पुणे, लातूर, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या पाऊस ओसरण्याचा अंदाज आहे. दरम्यान...

May 25, 2025 3:12 PM

views 11

देशात २८ मेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज

कोकण आणि गोवा, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून २८ मेपर्यंत बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम, तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ, तेलंगण आणि दक्षिण गुजरातमध्ये आज आणि उद्या बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात काल रात्री जोरदार पावसानं हजेरी लावली आणि दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

May 24, 2025 8:07 PM

views 18

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.   दरम्यान, आज कोकणात पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर  कायम आहे.  गेल्या २४ तासात जिल्हयात  ५८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कणकवली तालुक्यात १३० मिमी पावसाची नोंद झाली.    रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात पाणी भरलं आहे. रा...

May 23, 2025 9:12 PM

views 12

कोकणात रेड अलर्ट, तर १० जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्याच्या  विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरूच आहे. येत्या सोमवारपर्यंत  जिल्ह्याच्या किनारी भागात आणि इतर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची  शक्यता आहे. रत्नागिरी शहराला आज  रेड अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्या आहेत.   सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात सर्वाधिक पाऊस होत...

May 22, 2025 3:36 PM

views 11

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस

मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसान जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार पासून सुरु झालेला वादळी पावसाचा जोर आजही कायम आहे काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी  ५७ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस वेंगुर्ले तालुक्यात ८० मिमी पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी घर-गोठे यांची पडझड होऊन ५ लाख ७१ हजार  ९५० रुपयांचं नुकसान झाल्याही माहिती आपत्ती विभागातून देण्यात आली.    दोडामार्ग तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झा...

May 22, 2025 10:10 AM

views 17

देशातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये पुढच्या 2-3 दिवसांत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यांही येत्या रविवारपर्यंत जोरदार पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांत तसंच दिल्ली राजधानी क्षेत्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसंच, यावर्षी मोसमी पावसाचं आगमन लवकर होणार असून केरळमध्ये तो येत्या 2-3 दिवसांत पोहोचेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.