December 3, 2025 2:48 PM December 3, 2025 2:48 PM

views 27

राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव

राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.    अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. संसदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही बाब उघड झाल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात होता. मात्र, तारांकित प्रश्न हे ३५ दिवसांपूर्वी दाखल केले जातात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं आणि कृषीबद्दलचा प्रस्ताव अंतिम टप्प...

November 2, 2025 5:08 PM November 2, 2025 5:08 PM

views 28

व्हिएतनाममध्ये पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू, ६० जण जखमी

व्हिएतनाममध्ये विक्रमी पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले. पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. १६ हजार ५०० पेक्षा जास्त घरं अजूनही पुराच्या पाण्याखाली आहेत, तर १ लाखापेक्षा जास्त घरं  पुरात बुडाली.  ४२ हजार पशुधन दगावलं असून, ५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरची पिकं नष्ट झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. व्हिएतनामला यंदा मोठ्या संख्येनं वादळांचा फटका बसला असून, हवामान बदल हे याचं कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

October 19, 2025 10:09 AM October 19, 2025 10:09 AM

views 116

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत जारी

यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी ३ हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत. या जिल्ह्यांमधल्या २७ लाख ५९ हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे ५ हजार कोटींच्या निधी वितरणा...

October 19, 2025 9:50 AM October 19, 2025 9:50 AM

views 99

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत जारी

यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी ३ हजार २५८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला. राज्यभरातल्या २३ जिल्ह्यांतल्या ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातले हे शेतकरी आहेत. या जिल्ह्यांमधल्या २७ लाख ५९ हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे ५ हजार कोटींच्या निधी वितरणा...

October 17, 2025 8:32 PM October 17, 2025 8:32 PM

views 90

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांना मदत जारी

गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी एक हजार 356 कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.  सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्हांमधल्या २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१ हेक्टरहून अधिक बाधित पिकांसाठी ही मदत मिळेल. यासाठीचा शासन निर्णय झाल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे म्हटलं आहे.    या आपत्तीत मृत्यूमूखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना, ज्यांच्या पशुधनाचे नुकसान झाल...

October 8, 2025 7:30 PM October 8, 2025 7:30 PM

views 86

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ!

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, यासोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज मंत्रालयात पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी आयोजित  बैठकीत बोलत होते.  

October 5, 2025 8:00 PM October 5, 2025 8:00 PM

views 19

नेपाळमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे ४७ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे, भूस्खलन  आणि अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत. पूल वाहून गेले असून शुक्रवारपासून आतापर्यंत किमान ४७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती, नेपाळ मधल्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. इलम या  सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून किमान ३७ लोक दगावले आहेत. बेपत्ता व्यक्तींचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.    नेपाळमध्ये झालेल्या जीवित आणि मालमत्ता हानी बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त...

September 29, 2025 3:17 PM September 29, 2025 3:17 PM

views 54

राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसानं झालं आहे, या स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आदी मागण्या वडेट्टीवार यांनी केल्या आहेत...

August 27, 2025 6:27 PM August 27, 2025 6:27 PM

views 9

पंजाबमध्ये रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण

पंजाबमधे रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. रणजित सागर धरण आणि पोंग धरणांनी कमाल क्षमता गाठली असून गेल्या आठवड्यापासून भाक्रा धरणातून नियंत्रित पद्धतीनं पाणी सोडण्यात आलं.   सखल भागात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी किंवा मदत छावण्यांमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित क्षेत्रात अडकलेल्यांसाठी सेनादल, बीएसएफ, एनडीआरएफ आणि पंजाब पोलिसांची पथकं बचावकार्य करत असून गरज असेल तिथं हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. येत्या ३० ऑगस्टपर्यंत स...

July 29, 2025 2:38 PM July 29, 2025 2:38 PM

views 20

चीनमधे बिजींग इथं झालेल्या जोरदार पावसामुळे ३० जणांचा बळी

चीनमधे बिजींग इथं झालेल्या जोरदार पावसामुळे किमान ३० जणांचा मृत्यू झाला. बिजींगच्या ईशान्येकडील मियुन आणि यांगगींग भागात विक्रमी पाऊस झाला. या दोन्ही भागातल्या ८० हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पावसामुळे ३१ महामार्ग बाधित झाले असून १३६ गावांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. बिजींगच्या प्रशासनानं शहरातल्या लोकांना सतर्क राहण्याचा आणि पाण्याच्या प्रवाहापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.