July 19, 2025 7:16 PM

views 30

पाकिस्तान पंजाब प्रांतात वादळी पावसामुळे १२३ जणांचा मृत्यू, ४६२ हून अधिकजण जखमी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वादळी पावसामुळे १२३ पेक्षा जास्तजणांचा मृत्यू झाला तर ४६२ हून जास्त लोक जखमी झाले. गेल्या दोन दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे १० जणांचा बळी गेला. आपत्तीग्रस्त भागात सरकारचा कोणाही प्रतिनिधी पोहोचलेला नाही, तसंच आपत्तीग्रस्तांना कोणतीही मदत मिळालेली नाही. निवारा शिबिरांमधे कोणत्याही सुविधा नाहीत, त्यामुळे आपत्तीग्रस्तांनी तिथे आसरा घेतलेला नाही, असं वृत्त प्रसारमाध्यमांमधे आलं आहे.

July 8, 2025 1:33 PM

views 23

नेपाळ-चीन सीमेजवळच्या नाल्याला पूर, मदतकार्य सुरू

मुसळधार पावसामुळे नेपाळ-चीन सीमेजवळच्या नाल्याला पूर येऊन अडकलेल्या ३७ जणांपैकी २२ जणांना सुरक्षित जागा पोचवण्यात आलं आहे तर अन्य १५ जणांचा शोध सुरु आहे. पावसामुळे सीमेजवळच्या रसुवा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नऊजणांची सुटका करण्यात आली. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा वापर सुटकाकार्यासाठी करता येत नसल्याचं नेपाळच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. नेपाळमधला रसूआगढी जलविद्युत केंद्रालाही पुराचा फटका बसल्याचं वृत्त आहे. 

July 8, 2025 2:29 PM

views 27

नागालँडमध्ये मुसळधार पावसानं भूस्खलन

नागालँडमध्ये संततधार पावसामुळे दिमापूर, निउलँड या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, असं राज्य आपत्ती प्रतिसाद दलानं सांगितलं आहे. या जिल्ह्यातल्या सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचेही नुकसान झालं आहे. या आठवड्यात नागालँडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.

July 5, 2025 3:18 PM

views 18

अमेरिकेत टेक्सासमध्ये आलेल्या महापुरात २४ जणांचा मृत्यू

अमेरिकेत, टेक्सासमध्ये आलेल्या महापुरात २४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी मध्य टेक्सासच्या अनेक काउंटीज मध्ये  आपत्कालीन परिस्थिती  घोषित केली असून, शोध आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु राहील असं म्हटलं आहे.    टेक्साध्ये गेल्या गुरुवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या संपूर्ण प्रदेशात सरासरी ४ ते ८ इंच, तर  काही भागात १५ इंच पाऊस पडला. पूरग्रस्त भागात आणखी पाऊस पडेल असा अंदाज असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं.

June 5, 2025 1:41 PM

views 34

आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर

आसाममध्ये संततधार पावसामुळे अनेक भागात पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बराक, बुऱ्ही दिहिंग, कोपिली, सोनई, कटखल या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. या पुरामुळे १९ जिल्हे, दीड हजारांहून जास्त गावं आणि सहा लाखांहून अधिक जण प्रभावित झाले आहेत. पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.   एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या मदतीने बचाव कार्य वेगाने सुरू आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून १९० मदत छावण्या उभारण्यात आल्...

September 30, 2024 7:18 PM

views 30

नेपाळमध्ये पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने आलेल्या पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते रिषीराम तिवारी यांनी ही माहिती दिली.  विविध नैसर्गीक संकटात २६० जण जखमी झाले आहेत.  पूर आणि भूस्खलन अशा  संकटात सापडलेल्या ४ हजार ५०० नागरिकांना मदत आणि बचाव कार्यातल्या सुरक्षादलांनी  सुरक्षित स्थळी हलवलं आहे. महामार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

September 15, 2024 6:45 PM

views 42

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी

गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावात पाणी शिरलं आहे आणि शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्र्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

September 9, 2024 4:01 PM

views 29

नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटील यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

नांदेड इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज आढावा घेतला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातल्या नुकसानाची माहिती सादर केली. या बैठकीनंतर अनिल पाटील, नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा, आलेगाव आणि निळा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्यातल्या अतिवृष...

September 6, 2024 10:24 AM

views 23

आंध्रप्रदेश आणि तेलंगणतील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

आंध्रप्रदेशात आलेल्या पुरामुळे अंदाजे दीड लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, २ लाख शेतकाऱ्यांना फटका बसला आहे असं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. विशेषत: हळद आणि फूल पिकांना अतिवृष्टीची झळ बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील पूरस्थितीची पाहणी करण्याकरता चौहान कालपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी विजयवाडा, प्रकाशम धरण तसंच कृष्णा नदी लगतच्या पूरग्रस्त शेतांची हवाई पाहणी केली. पंचनामे करण्याची प्रक्रिया सुर...

September 5, 2024 12:50 PM

views 28

आंध्रप्रदेशातल्या पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथक आज पाहणी करणार

आंध्रप्रदेशातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय गृहविभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार जिंदाल यांच्या नेतृत्वाखालचं पथक जात आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यापूर्वी या पथकानं ताडपल्ली इथं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.  देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्रविभागाने व्यक्त केली आहे, छत्तीसगड मधे पुढचे सहा दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून सौराष्ट्र आणि कच्छमधे उद्यापर्यंत जोरदार पाऊस राहील....