June 7, 2025 1:18 PM

views 24

देशात कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ३६४ वर

देशातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या काल ५ हजार ३६४ झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधल्या २ तर पंजाब आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.   केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून एका दिवसात १९२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८, दिल्लीत ३० आणि महाराष्ट्रात २२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत सक्रिय रुग्णसंख्या ५९२ वर पोहोचली आहे.

June 3, 2025 3:23 PM

views 30

कोविड- १९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्र राज्य सरकारनं कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व आरोग्य सुविधांनी इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि श्वसनाची गंभीर समस्या असलेल्या ५ टक्के रुग्णांची तपासणी करावी, असे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागानं सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि जिल्हा प्रशासनांना हे निर्देश दिले आहेत. हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेचं आरोग्य, खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणं तसंच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचं वर्तन याबाबत जनजागृती करणारे उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहे...

July 20, 2024 7:56 PM

views 24

भारतात कोरोना महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन

भारतात २०२० मध्ये कोविड -१९ महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ या नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नियतकालिकात प्रकाशित अहवाल चुकीचा असून लेखकांच्या  कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. अहवालातील दाव्यात सुसंगती नसून अस्पष्टता आढळते. या अभ्यासातील निष्कर्ष आणि प्रस्थपित कोविड-१९ मृत्युप्रमाण प्रारूप, यात विसंगतीदेखील दिसते.  यामुळे हा अहवाल विश्वासार्ह ठरत नाही, असं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे.

July 18, 2024 3:27 PM

views 22

कोरोना बाधित जो बायडन यांनी अध्यपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या मागणीला जोर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोविड-1९ चा संसर्ग झाल्यानंतर,अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी यासाठीचा दबाव वाढत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते, तसंच कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी ॲडम शिफ यांनी,अध्यक्ष बायडन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचं जाहीर आवाहन केलं आहे.   बायडन यांनी आपल्या वयाशी निगडित आरोग्य आणि स्वास्थ्याचा विचार करून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही, तर देश आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी ते हितकारक ठरेल, असं मत अमेरिकी संसदेच्या बहुसंख्य नेत्...