देशातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या काल ५ हजार ३६४ झाली असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधल्या २ तर पंजाब आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून एका दिवसात १९२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८, दिल्लीत ३० आणि महाराष्ट्रात २२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत सक्रिय रुग्णसंख्या ५९२ वर पोहोचली आहे.