February 25, 2025 8:51 AM February 25, 2025 8:51 AM

views 18

महाराष्ट्र AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्य शासन प्रशासकीय कामकाज आणि अर्थव्यवस्थेला गती देत आहे; महाराष्ट्र लवकरच देशाच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते.   देशातली ६० टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. २०३०पर्यंत राज्यातली ५० टक्के वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल असं फडणवीस म्हणाले. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांचं उत्पन...

February 17, 2025 9:44 AM February 17, 2025 9:44 AM

views 6

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. शेंदुर्णी सहकारी संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला; यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे प्रामुख्याने वीज आणि पाण्यासंदर्भातील प्रश्न ...

February 16, 2025 8:43 AM February 16, 2025 8:43 AM

views 11

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम पोलीस दलानं करावं – मुख्यमंत्री

राज्य सरकारच्या वतीनं पोलीस दलाकरीता नवीन कार्यालयं, वाहनं, सीसीटिव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.   पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित ‘तरंग-2025’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल...

February 15, 2025 11:15 AM February 15, 2025 11:15 AM

views 6

जुन्या खटल्यांच्या तपासासाठी राज्य सरकारकडून 27 न्यायवैद्यकशास्त्र व्हॅन्स तैनात

या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलिस दलाच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना नव्या कायद्यांबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती वार्ताहरांना दिली. सात वर्षांपेक्षा जास्त जुन्या खटल्यांच्या तपासासाठी राज्य सरकारनं 27 न्यायवैद्यकशास्त्र व्हॅन्स तैनात केल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.   नव्या कायद्यांतर्गत, न्यायालयांमध्ये ऑनलाईन प्रणाली स्थापित केली असली तरीही न्यायालये, न्यायवैद्यक प्रयोगशाळेत समर्पित व्यवस्था उभारावी लागणार असून त्यावर काम सुरू असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तारखांवर ...

February 11, 2025 7:35 PM February 11, 2025 7:35 PM

views 9

‘वेव्ह्ज २०२५’ परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेच्या धर्तीवर वेव्ह्ज २०२५ ही परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह इतरांशी मुंबईत मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी राज्य शासनाकडून आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

February 11, 2025 7:58 PM February 11, 2025 7:58 PM

views 12

SSC-HSC परीक्षेत सामूहिक कॉपी होणाऱ्या केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द

दहावी-बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. तसंच कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश ही त्यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी आ...

February 11, 2025 7:11 PM February 11, 2025 7:11 PM

views 8

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार असून पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत बांद्रा-कुर्ला संकुलात महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. २३ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात एकूण ५०० पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत. 

February 10, 2025 6:48 PM February 10, 2025 6:48 PM

views 9

विद्यार्थ्यांनी स्वतःशी स्पर्धा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातल्या भितीवर विजय मिळवावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा पे चर्चा हा संवाद ऐकल्यानंतर ते बोलत होते. परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातल्या आव्हानांशी सामना कसा करावा हे समजण्यासाठी प्रधानमंत्र्यांशी झालेला संवाद उपयुक्त आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

February 10, 2025 3:15 PM February 10, 2025 3:15 PM

views 15

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र विधानसभेची निवडणूक मनसेने स्वबळावर लढवली होती. अलिकडेच राज ठाकरे यांनी विधानसभेत महायुतीला मिळालेल्या मतांवर शंकाही उपस्थित केली होती. 

February 10, 2025 3:38 PM February 10, 2025 3:38 PM

views 14

विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी १०० एकर जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

विदर्भातल्या स्थानिक तरुणांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी शंभर एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. नागपूर विद्यापीठ परिसरात काल खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.    विदर्भातल्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचं काम या महोत्सवाने केल्याचं फडणवीस म्हणाले.   खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीत विविध प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींच...