February 10, 2025 6:48 PM

views 28

विद्यार्थ्यांनी स्वतःशी स्पर्धा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातल्या भितीवर विजय मिळवावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा पे चर्चा हा संवाद ऐकल्यानंतर ते बोलत होते. परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातल्या आव्हानांशी सामना कसा करावा हे समजण्यासाठी प्रधानमंत्र्यांशी झालेला संवाद उपयुक्त आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

February 10, 2025 3:15 PM

views 34

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र विधानसभेची निवडणूक मनसेने स्वबळावर लढवली होती. अलिकडेच राज ठाकरे यांनी विधानसभेत महायुतीला मिळालेल्या मतांवर शंकाही उपस्थित केली होती. 

February 10, 2025 3:38 PM

views 29

विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी १०० एकर जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

विदर्भातल्या स्थानिक तरुणांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी शंभर एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. नागपूर विद्यापीठ परिसरात काल खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.    विदर्भातल्या प्रत्येक क्षेत्राचा विकास होत असून त्या क्षेत्रांना व्यासपीठ देण्याचं काम या महोत्सवाने केल्याचं फडणवीस म्हणाले.   खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीत विविध प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींच...

February 6, 2025 7:23 PM

views 13

उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचे निर्देश

उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी चिंचवड इथं पोलीस आयुक्तालय इमारतीच्या पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते. राज्यातली होऊ पाहणारी जागतिक गुंतवणूक लक्षात घेता उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करणं आवश्यक असल्याचं फडनवीस म्हणाले. उद्योगांना त्रास दिल्याच्या, खंडणीची मागणी केल्याच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत असून असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असे करणारे महायुतीतल...

February 5, 2025 8:18 PM

views 42

येत्या ५ वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करुन सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊर्जा विभागाने पुढच्या पाच वर्षाचे वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वीजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्...

February 3, 2025 8:40 PM

views 21

सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा मुख्यंत्र्यांकडून आढावा

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण भागातल्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत १६ लाख ८१ हजार ५३१ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित घरांच्या कामांना गती देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यासोबत आयुष्मान भारत आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ राज्यातल्या रुग्णांना मिळावा, यासाठी नोंदणीच्या कामाला गती द्यावी. तसंच यामधला मानवी हस्तक्षे...

February 3, 2025 8:50 AM

views 24

आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आदिवासींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वसमावेशक आरोग्य धोरण तयार केल जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केल. आदिवासींच्या आरोग्याच्या समस्या दूर करणं, केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नागपूर इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय 'फिस्ट-2025' या परिषदेत ते काल बोलत होते. नागपूर शहर, आदिवासी राजानं स्थापन केलेलं असल्यामुळ, ही परिषद य...

February 2, 2025 7:45 PM

views 32

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात ते आज बोलत होते. चक्रधऱ स्वामी आणि त्यांच्या अनुयायांनी विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचं कार्य केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं महानुभाव पंथाच्या अनेक मंदिराचा विकास केला आहे, तसंच रिद्धपूर पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंदप्रभू देवस्थान या ठिकाणीही संवर्धनाच...

January 28, 2025 8:30 PM

views 25

जीबीएस रुग्णांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

जीबीएस, अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमधे विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतला. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असेल तर सार्वजनिक आरोग्य विभागानं ती करावी, असं त्यांना सांगितलं.   हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेलं अन्न मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे ...

January 27, 2025 7:11 PM

views 30

पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातल्या नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्यानं तपासणी, रिअल टाईम मॉनिटिरिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. छोट्या छोट्या स्त्रोतांचं प्रदुषण कमी होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.   मत्स्य व्यवसाय ...