March 27, 2025 3:02 PM

views 29

घरापासून 5 किलोमीटरच्या परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे – मुख्यमंत्री

राज्यातल्या नागरीकांना त्यांच्या घरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातच उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.   आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना आणि आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात याव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करुन आरोग्य क्षेत्रातल्या सुविधा अत्याधुनिक दर्जाच्या उभाराव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी ...

March 23, 2025 3:37 PM

views 29

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करुन विकास आराखडा राबवणार

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगाने करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून प्रयागराजच्या धर्तीवर  लवकरच कायदा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिकमध्ये आज फडणवीस यांनी कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरू असून त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याला मान्यता दिली आहे.   नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी खासगीकरणातून कामे करण्यात येणार असून पुढच्या महिन...

March 22, 2025 8:45 PM

views 24

नागपूर दंगलीत नुकसान झालेल्यांना येत्या ३-४ दिवसात नुकसान भरपाई मिळणार

नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीत सर्वसामान्यांच्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई येत्या ३-४ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दंगलीमध्ये ७१ वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची सर्व रक्कम दंगेखोरांकडून वसूल केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नागपूर शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.  नागपूर शहराच्या अकरा पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. लवकरच यात शिथिलता ...

March 22, 2025 1:05 PM

views 25

‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल, फेज -१’ या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांना लक्षणीय चालना मिळाली

राज्यात पायाभूत सुविधांचं काम विलक्षण वेगानं सुरु असून ‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल, फेज -१’ या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना लक्षणीय चालना मिळाली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.   पायाभूत सुविधांसाठी राज्यात ४१ हजार ७३० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून सुमारे सहा हजार किलोमीटर रस्त्यांची कामं या प्रकल्पाअंतर्गत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्तापर्यंत २५ हजार ८७५ कोटी रुपयांची तरतूद झाली असून अनेक बँकांच्या आर्थिक सहकार्यामुळे मजब...

March 21, 2025 9:23 AM

views 28

महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल प्रशासनासाठी मायक्रोसॉफ्ट सहकार्य करणार

मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनचे  सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात  सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत त्यांची सकारात्मक चर्चा झाली.   राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी  योजनांविषयी  मुख्यमंत्र्यांनी गेट्स यांना माहिती दिली. त्यामध्ये नवी मुंबई इथली इनोव्हेशन सिटी , मलेरियामुक्त महाराष्ट्र, लखपती दीदी तसेच लाडकी बहीण योजनेचा समावेश होता.  गेटस यांनी सर्व उपक्रमासाठी आर्थि...

March 19, 2025 7:39 PM

views 38

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ नागपूर इथं उभारलं जाणार

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ नागपूर इथं उभारलं जाणार आहे. याबाबतची अधिसूचना काल प्रकाशित झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.   महाराष्ट्रानं याआधीच न्यायवैद्यक विज्ञान शास्त्रात आघाडी घेतली असून या विद्यापीठामुळे याला अधिक चालना मिळेल, असा विश्वास फडनवीस यांनी समाजमाध्यमात व्यक्त केला आहे. तर, या विद्यापीठाचा लाभ या क्षेत्रातले विद्यार्थी, संशोधक आणि कर्मचाऱ्यांना होईल, असं महसू...

March 18, 2025 3:37 PM

views 25

Nagpur Violence : पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

नागपुरातल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.   काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं. सर्व समुदायांचे सण-उत्सव सध्या सुरू आहेत आणि अशा वेळी सर्वांनीच एकमेकांप्रति आदरभाव राखावा, शांतता राखावी, असं आवाहनही फडणवीसांनी केलं. नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू प...

March 12, 2025 8:02 PM

views 24

जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला बळी न पडण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. जादा व्याज देणाऱ्या ९९ टक्के योजना या फसव्या असतात, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.   अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होऊ लागल्यानं MPSC कडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी विधानपरिषदेत दिली. अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात, असं ते म्हणाले. 

March 12, 2025 3:20 PM

views 29

ST महामंडळासाठी भाडेतत्वावर बसगाड्या घेण्याच्या निविदा प्रक्रियेची चौकशी

टोरेस सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठा व्याज परतावा देण्याचं आश्वासन हा ९९ टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.    शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही, असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून या मह...

March 11, 2025 8:39 PM

views 17

प्रार्थनास्थळावरचे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद, मर्यादित कालावधीसाठीच परवानगी

प्रार्थनास्थळांवरच्या भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि यासंदर्भातल्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आता संबंधित पोलिस ठाण्याच्या निरिक्षकांवर सोपवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी भाजपाच्याच सदस्य देवयानी फरांदे यांनी उपस्थित केली. सद्यस्थितीत या नियामंचं पालन होत नसल्याचं दिसून आलं आहे, मात्र, आगामी काळात या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मद्यविक्री दुकानं नव्या जागेवर स्थलांतरि...