April 8, 2025 6:54 PM April 8, 2025 6:54 PM

views 9

येत्या पाच वर्षांत राज्यातल्या सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचं दिसेल-मुख्यमंत्री

येत्या पाच वर्षांत राज्यातल्या सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचं दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट २५’ या कार्यक्रमात बोलत होते.   राज्यात गुंतवणुकीसाठी विनाअडथळा सुविधा पुरवल्या जात आहेत. राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी परिसंस्था तयार केली जात आहे. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करत असून त्यासाठी कौशल्य विद्यापीठ कार्यरत आहे. हरित आणि स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांवरही आम्ही भर दे...

April 7, 2025 7:25 PM April 7, 2025 7:25 PM

views 12

सायबर गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज-मुख्यमंत्री

सायबर गुन्हेगारी रोखणं हे सर्वात मोठं आव्हान असून हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं. मुंबई पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचं लोकार्पण आज देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आझाद मैदान पोलीस ठाण्यातल्या उत्कर्ष सभागृहात झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतल्या सर्व पोलीस ठाण्यांमधे महिला केंद्रित सोयी सुविधा उभारल्या असून पोलीस ठाणे लोकाभिमुख झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.    महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा यासाठी पोलीस ठाण्या...

April 7, 2025 6:33 PM April 7, 2025 6:33 PM

views 14

दिव्यांगांसाठी रोजगार आणि स्टॉलबाबतचं धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाकरता नवनवीन योजना आणि धोरणं आखण्याचे, तसंच त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज संबंधित विभागांना दिले. दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत मुंबईत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.   दिव्यांगाना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाण...

April 6, 2025 6:22 PM April 6, 2025 6:22 PM

views 15

विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन

विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी या डेस्कच्या माध्यमातून कार्य केलं जाईल. गुन्हेगारीत अडकलेली अनेक मुलं गरीब, दुर्बल घटकांतली असून त्यांना कायदेविषयक माहितीचं ज्ञान नसतं. या उपक्रमामुळे त्यांना समुपदेशन आणि  मार्गदर्शन केलं जाणार आहे.  हा उपक्रम विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाणार आहे. 

April 5, 2025 8:12 PM April 5, 2025 8:12 PM

views 13

राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित-मुख्यमंत्री

राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने महसूल विभागाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमासंबंधीच्या क्षेत्रीय कार्यशाळेचं कालपासून पुणे इथं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. १०० दिवसांचा कृती कार्यक्रम कार्यालयांमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू असल्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं. महसूल विभागाच्या हस्तपुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

March 31, 2025 7:45 PM March 31, 2025 7:45 PM

views 12

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं-मुख्यमंत्री

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल, असं आश्वासनही त्यानी दिलं. ते आज भारती कृष्ण विद्या विहार शाळेत शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या दोन खंडांच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताची महती आणि उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणं गरजेचे आहे, असं ते म्हणाले.  &n...

March 29, 2025 7:51 PM March 29, 2025 7:51 PM

views 12

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला शासनाची तत्वतः मान्यता

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून महत्वाच्या कामांसाठी तातडीनं निधी वितरित केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज तुळजापूर विकास आराखड्याचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या आराखड्याची दोन वर्षांत अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

March 29, 2025 7:49 PM March 29, 2025 7:49 PM

views 15

पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढीपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री

पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्णन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आज केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पंढरपूर कॉरिडॉरचं काम सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

March 24, 2025 7:42 PM March 24, 2025 7:42 PM

views 8

कुणाल कामरा अडचणीत ! कठोर कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिलं. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा गोष्टी सहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.    शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली. त्याने राज्यातले वातावरण दूषित केले आणि यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं खोतकर म्हणाले. ...

March 23, 2025 7:12 PM March 23, 2025 7:12 PM

views 10

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा रोडमॅप तयार-मुख्यमंत्री

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा रोडमॅप तयार असून हे उद्दिष्ट २०२९ मधेच साध्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त  केला. सीआयआय यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज नाशिकमधे झाला, यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत, त्या दृष्टीनं समृद्धी महामार्ग तयार झाला असून शक्तिपीठ महामार्गही तयार केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक म...