July 2, 2025 8:07 PM
28
गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक-मुख्यमंत्री
गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं करता यावा यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विधानभवन येथे नवीन फौजदारी संहिता कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामं श्रेणीबद्ध करावीत, असंही ते म्हणाले. नवीन फौजदारी कायद्यांमुळे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करता येत असल्याचं ते म्हणाले. गुन्हे सिद्ध करण्यास...