राज्यात अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत सरकार विचार करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. पावसामुळे सुक्या मासळीचं नुकसान झालेल्या मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. घराची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी मदतीकरीता तात्काळ निधी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सुमारे ४९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी या बैठकीत दिली.
Site Admin | June 3, 2025 7:34 PM | Chief Minister | Chief Minister Devendra Fadnavis
अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत सरकार विचार करेल, असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
