June 6, 2025 7:27 PM June 6, 2025 7:27 PM

views 16

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या जयजयकारानं यावेळी किल्ले रायगड दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी सादर केलेल्या लोककला आणि पोवाड्यांमुळं रायगडावरचं वातावरण शिवमय झालं होतं. छत्रपती संभाजी राजे आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराजांना यावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली. राज्यात इतरत्रही यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. नं...

April 12, 2025 1:33 PM April 12, 2025 1:33 PM

views 11

अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी राज्यशासन वचनबद्ध- मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे त्यांना महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवू नका असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. महाराष्ट्रात किल्ले रायगड इथं छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.    अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक विकसित करण्यासाठी राज्यशासन कसोशीने प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं. दिल्लीतही छत्रपतींचं स्मारक उभारावं अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे खासदार आणि ...

March 17, 2025 3:58 PM March 17, 2025 3:58 PM

views 9

ठाणे भिवंडी इथं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करुन, त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. ही स्थळं आहेत, म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, या स्थळांच्या विकासासंबंधी माहिती दिली. या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी, या मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून ...

March 3, 2025 7:26 PM March 3, 2025 7:26 PM

views 17

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. हा पुतळा ८३ फूट उंच असेल. हा पुतळा वर्षानुवर्षे टिकेल असा विश्वास शिल्पकार अनिल सुतार यांनी व्यक्त केला. एका महिन्यात पुतळ्याचं काम पूर्ण होईल.