डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या जयजयकारानं यावेळी किल्ले रायगड दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी सादर केलेल्या लोककला आणि पोवाड्यांमुळं रायगडावरचं वातावरण शिवमय झालं होतं. छत्रपती संभाजी राजे आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराजांना यावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली. राज्यात इतरत्रही यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. नंदुरबारमध्ये आज शिवराज्याभिषेक गुढी उभारण्यात आली होती. परभणी जिल्हा परिषदेनंही शिवाजी महाराजांच्या चरित्र ग्रंथांचं वितरण केलं. धुळ्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा