छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार वैश्विक आहे त्यांना महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवू नका असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. महाराष्ट्रात किल्ले रायगड इथं छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक विकसित करण्यासाठी राज्यशासन कसोशीने प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं. दिल्लीतही छत्रपतींचं स्मारक उभारावं अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयन राजे भोसले यांचंही यावेळी भाषण झालं. छ्तरपती शिवरायांशी संबंधित पर्यटन स्थळांचं सर्किट विकसित करावं अशी मागणी त्यांनी केली.
कार्यक्रमापूर्वी अमित शहा यांनी पाचाड इथं जाऊन राजमाता जिजाऊ भोसले यांच्या समाधीला वंदन केलं.