September 12, 2024 6:48 PM

views 29

राहुल गांधी यांच्या विरोधात उद्या भाजपाचं राज्यभर आंदोलन

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याचं भाजपाच्या माध्यम विभागानं कळवलं आहे.   भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात, तर मुंबईत आमदार आशिष शेलार, आमदार पंकजा मुंडे आंदोलन करणार आहेत. ठाण्यात रवींद्र चव्हाण, जळगावात गिरीश महाजन, पुण्यात चंद्रकांत पाटील, चंद्रपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.    याशिवाय अहिल्यादेवीनगरमध्ये राम शिंदे, नाशिकला देवयानी फरांदे, सीमा हिरे, नागपूरमध्ये विक्रांत पाटील, नंदुरबारमध्ये...

September 10, 2024 7:36 PM

views 12

हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २१ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आज २१ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून कॅप्टन योगेश बैरागी यांना ऑलिंपिक खेळाडू विनेश फोगट यांच्या विरुद्ध  उमेदवारी दिली आहे. कृष्णा गहलावत,  राई  मतदारसंघातून निवडणूक लढवतील.  बिमला चौधरी पतौडी मतदारसंघातून तर प्रदीप सांगवान बरोदा विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. फिरोजपूर झिरका मतदारसंघातून नसीम अहमद यांना रिंगणात उतरवण्यात आलं असून पुनहाना विधानसभा मतदारसंघातून एराज खान हे पक्षाचे उमेदवार आहेत. यापूर्वी भाजपनं एक...

September 9, 2024 7:02 PM

views 21

राज्य विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवून १२५ जागा जिंकण्याचं भाजपाचं लक्ष्य

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं १६० जागा लढवाव्या. त्यातल्या किमान १२५ जागा जिंकण्याचं उद्दिष्ट पक्षानं ठेवावं यावर भाजपाच्या कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी जागावाटपाची अनौपचारिक चर्चा सुरू झाली आहे. पण त्यांना ७० हून अधि...

September 8, 2024 6:12 PM

views 21

भाजपच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात सीबीआयची कारवाई

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त, एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि एक वकील यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी याआधी सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

September 6, 2024 7:56 PM

views 36

माजी राज्यसभा खासदार सुजीत कुमार यांचा भाजपामध्ये प्रवेश

बीजू जनता दलाचे माजी राज्यसभा खासदार सुजीत कुमार यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तत्पूर्वी सुजीत कुमार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तो स्वीकारला. दरम्यान, बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी सुजीत कुमार यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षातून काढून टाकलं.

September 6, 2024 7:20 PM

views 21

राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी किती जागा लढवाव्यात याबद्दल महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नसून राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर त्याआधीच्या सरकारने सुरू केलेल्या १५  योजना त्यांनी बंद केल्या, आता महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर ५० ते ६० योजना बंद करण्याचा त्यांचा विचार आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे, राज्यातल्या १४ कोटी जनतेच्या कल्याणास...

September 6, 2024 12:20 PM

views 20

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाकडून ४० स्टार प्रचारकांची नावं जाहीर

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने काल 40 स्टार प्रचारकांची नावं जाहीर केली. यात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, जी. किशन रेड्डी, जितेंद्र सिंह आणि शिवराजसिंह चौहान हे देखील प्रचाराची धुरा सांभाळतील. 90 सदस्यीय जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि ...

September 2, 2024 8:37 PM

views 18

भाजपाच्या मुख्यालयातून भाजपा सदस्य मोहिमेला सुरुवात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या नवी दिल्ली इथल्या मुख्यालयातून भाजपा सदस्य मोहिमेला  सुरुवात केली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून आपल्या सदस्यत्वाचा नवा दाखल घेत प्रधानमंत्र्यांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यांमधल्या नागरिकांना नव्हे तर संपूर्ण खेड्यांनाच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचं सदस्य बनवावं असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.    भाजपा हा जगातला केवळ सर्वाधिक मोठा राजकीय पक्ष नसून तो लोकशाहीवादी पक्षही असल्याचं प्रतिपादन केंद्रीय ...

September 2, 2024 1:48 PM

views 28

भाजपा पक्षाचा देशव्यापी  संघटनात्मक  महोत्सव आजपासून सुरू

भारतीय जनता पक्षाचा देशव्यापी संघटनात्मक महोत्सव आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाअंतर्गत  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज संध्याकाळी  ५ वाजता प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांना पक्षाचे सदस्यत्व देणार आहेत.   यानंतर  देशव्यापी संघटना महोत्सवाला सुरुवात होणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी  पक्ष कार्यालयातून या महोत्सवाच्या  उद्घाटनाचं  थेट प्रक्षेपण पाहणार आहेत.  

August 28, 2024 1:34 PM

views 31

पश्चिम बंगालमध्ये भाजपानं जाहीर केलेल्या ‘बंदला’ संमिश्र प्रतिसाद

पश्चिम बंगालमध्ये भाजपानं आज जाहीर केलेल्या ‘बंदला’ संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ‘नबन्ना अभिजन’ आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ आज भाजपानं बंगाल मध्ये ‘बंदची हाक’ दिली होती. दरम्यान, कोलकत्यात तुरळक प्रमाणात वाहतूक सुरु असून दुकानं तसंच शाळा, महाविद्यालयं चालू  असल्याचं वृत्त आहे.