October 22, 2024 3:57 PM

views 65

भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार

भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती नितेश राणे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. हे सगळं पक्षीय धोरण असल्याचं सांगून  महायुतीच्या फार्म्युल्यानुसार पक्षप्रवेश करत असल्याचं राणे म्हणाले. भारतीय जनता पक्षासोबत आपले नेहमीच चांगले संबंध राहणार असल्याचही त्यांनी  स्पष्ट केल.

October 18, 2024 9:04 PM

views 28

मतदार याद्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत श्वेतपत्रिका काढण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल निवडणूक आयोगानं घ्यावी आणि मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि त्यांना यासंदर्भात निवेदन दिलं. तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगालाही या संदर्भात पत्र लिहिलं आहे. पराभवाची भीती वाटत असल्यानं महाविकास आघाडीच्या...

October 16, 2024 7:19 PM

views 27

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यात सहभागी होणार आहेत. यावेळी उमेदवार यादीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

October 14, 2024 8:11 PM

views 21

महाराष्ट्र भाजपाच्या कोअर समितीची बैठक

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपाच्या कोअर समितीची बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा उपस्थित होते. विधानसभेच्या १५० ते १६० जागा लढवण्यावर चर्चा झाली. तसंच राज्यातील मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाबाबत काय तोडगा काढता येतील, यावरही चर्चा झाली.

October 14, 2024 11:02 AM

views 22

हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी अमित शहा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती

हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.   तर, जम्मू-काश्मीर मधील विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

October 7, 2024 7:13 PM

views 44

विनोद अग्रवाल यांचं निलंबन मागे

विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपानं आज मागे घेतलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी न दिल्यानं अपक्ष लढत त्यांनी विजय मिळवला होता. गेल्या ५ वर्षात अग्रवाल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. यंदा विनोद अग्रवाल यांना महायुती गोंदियातून उमेदवारी देणार असल्याचं आमदार परिणय फुके यांनी सांगितलं.

October 4, 2024 5:31 PM

views 19

निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाची निवडणूक संचालन समितीची स्थापना

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश भाजपानं निवडणूक संचालन समिती स्थापन केली असून रावसाहेब दानवे तिचे अध्यक्ष आहेत. जाहीरनामा समितीची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर असून त्याकरता नागरिकांनी सूचना पाठवाव्यात असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे.   या समितीत चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे.

September 26, 2024 3:10 PM

views 26

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू – चंद्रशेखर बावनकुळे

संघटन शक्ती मजबूत करण्याची आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात दिली आहे. या मूलमंत्राचे पालन करुन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले. मुंबईत ते वार्ताहरांना संबोधित करत होते. या दौऱ्यात अमित शहा यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळं संघटनेत ऊर्जा निर्माण झाली आहे. महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना आता जोमानं काम करेल, असंही त्य...

September 14, 2024 8:08 PM

views 30

महाराष्ट्रात पुन्हा एनडीएचं सरकार आणण्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं आवाहन

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पुन्हा एनडीएचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे. नड्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत एकत्र लढवायची आहे, असं त्यांनी राज्याच्या भाजपा नेत्यांना सांगितलं. निवडणुकीत एनडीएचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील य...

September 13, 2024 7:31 PM

views 34

राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचं आंदोलन

लोकसभतले विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या  आरक्षणा संदर्भातल्या कथित वक्तव्याविरोधात आज भाजपातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.     हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे , माजी आमदार गजानन घुगे यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं.   नंदूरबार जिल्ह्यात नगरपालिका चौकात माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या नेतृत्त्वाखाली राहूल गांधी यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. या वेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ...