August 27, 2024 10:25 AM

views 33

जेएमएमचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन येत्या 30 तारखेला भाजपामध्ये प्रवेश करणार

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात जेएमएमचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन या महिन्याच्या 30 तारखेला रांची इथं भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भातील घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी समाज माध्यमावर एका संदेशातून केली आहे. ते भाजपाचे झारखंड निवडणूक सह-प्रभारी देखील आहेत. सरमा यांच्यासह सोरेन यांनी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अलीकडेच चंपई सोरेन यांनी JMMनेतृत्वावर त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

August 24, 2024 7:19 PM

views 24

महिलांवरच्या अत्याचाराच्या मुद्द्यावरुन राजकारण न करण्याचं भाजपाचं आवाहन

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आज राज्यात जागर जाणिवेचा हे अभियान राबवलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत इथं झालेल्या आंदोलनात अत्याचाराच्या घटनेचा निषेध केला. या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यात कुणीही राजकारण करू नये असं बावनकुळे म्हणाले. इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनात पक्षाचे विविध नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात मुंबईती...

August 20, 2024 7:07 PM

views 24

भाजपाकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामध्ये किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, ओदिशामधून ममता मोहंता, राजस्थान सरदारर रवनीत सिंह बिट्टु आणि त्रिपुरामधून राजीब भट्टाचार्जी यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.  

August 9, 2024 7:26 PM

views 21

यवतमाळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचं लोकार्पण

यवतमाळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचं लोकार्पण केलं. डबघाईला आलेल्या सूतगिरण्या खाजगी कंपनीला चालवायला देण्याचा निर्णय नवीन वस्त्रोद्योग धोरणात आहे असं त्यांनी सांगितलं. वस्त्रोद्योग मंत्रालयाने राज्यात घोषित केलेले वस्त्रोद्योग प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात आणण्याबाबत आपण स्थानिक आमदारांशी चर्चा करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

August 3, 2024 7:34 PM

views 44

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष – अतुल लोंढे

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे केली आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. नागपुरात म्हाळगीनगर आणि मानेवाडा वळण रस्त्याच्या उड्डाण पुलाचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या स्थानिक आमदारांना निमंत्रण दिलं गेलं नसल्याचा दावा करत, हा कार्यक्रम भाजपाचा होता, की राज्य सरकारचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारी प्रकल्पांचे काम हे जनतेने दिलेल्या कराच्या पैशांतून होते, त्यामुळेच अशा प्रकल्पांशी...

July 24, 2024 12:29 PM

views 33

नीट आणि अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याची रवी शंकर प्रसाद यांची टीका

नीट आणि अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका भाजपा नेते रवी शंकर प्रसाद यांनी आज केली. नीट परीक्षेचे आयोजन योग्यरित्या झालं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. परीक्षेच्या संदर्भातल्या अनियमितता लक्षात आल्यावर सरकारने तत्काळ सीबीआय चौकशी सुरू केली होती, असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जगात भारताची नकारात्मक प्रतिमा तयार केली आहे. अर्थसंकल्पात सर्व समाज घटकांसाठी तरतुदी केल्या आहेत. त्यामुळं विरोधीपक्षांनी अर्थसंकल्प नीट वाचून समज...

July 21, 2024 7:35 PM

views 22

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल – गृहमंत्री अमित शहा

  महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भाजपाच्या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते.   केंद्राकडून महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला, युती सरकारच्या काळात बरीच विकासकामं झाली, अनेक मोठे प्रकल्प राज्यात राबवले गेले, असं शहा म्हणाले. फक्त भाजपाच महान भारत घडवू शकतो, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्येत राममंदिर उभं राहिलं, त्यांनी देशातला दहशतवाद कमी केला, अस...

July 20, 2024 7:51 PM

views 25

भाजपाचं उद्या पुण्यात महाअधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं महाअधिवेशन उद्या पुण्यात होणार असून यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. शाह यांच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप होईल. 

July 20, 2024 3:35 PM

views 42

भाजपाच्या अधिवेशनात ५,३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पुण्यात उद्या होणाऱ्या भाजपाच्या अधिवेशनात ५ हजार ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास महायुतीनं नागरिकांच्या कल्याणासाठी सुरु केलेल्या सर्व योजना ते बंद करतील, असं बावनकुळे म्हणाले.

July 16, 2024 3:47 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ जुलैला भाजपाचं व्यापक अधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी, 21 तारखेला भाजपाच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांचं व्यापक अधिवेशन पुण्यात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले सर्व केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीबद्दल महत्वपूर्ण चर्चा आणि काही निर्णय या अधिवे...