November 10, 2024 6:24 PM November 10, 2024 6:24 PM
8
काँग्रेसने संविधान बदलण्यात येणार असल्याचा विषारी प्रचार चालवलाय – मंत्री नितीन गडकरी
काँग्रेस ने संविधानाचा सोयीनुसार वापर केला, अवहेलना केली, आणि आता संविधान बदलण्यात येणार असल्याचा विषारी प्रचार चालवला आहे, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केली आहे. यवतमाळमधे राळेगाव इथं ते प्रचारसभेत बोलत होते. त्यामुळे जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहावं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.