August 25, 2024 8:23 PM

views 13

बांगलादेश : नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस यांनी हंगामी सरकारकडून निवडणुकांचं नियोजन मागवलं

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी हंगामी सरकारकडून शक्य तितक्या लवकर निवडणुका घेण्यासाठी नियोजन मागवलं आहे. प्राध्यापक युनुस यांच्या नेतृत्वाखालच्या हंगामी सरकारने अद्याप राजकीय पक्षांशी या संबंधी संवाद साधलेला नसल्याबद्दल मिर्झा यांनी काल ढाका इथं असंतोष व्यक्त केला.

August 23, 2024 3:43 PM

views 18

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. शहरातली बहुतांश दुकानं, शाळा-महाविद्यालयं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहर परिवहन उपक्रमासाह खासगी वाहतूक व्यवस्थाही बंद असल्यानं कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना पायपीट करावी लागली.  भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, पापाची तिकटी या परिसरात घोषणा देणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं.

August 16, 2024 8:42 PM

views 23

बांगलादेशातल्या हिंदूंना संरक्षण देण्याची महम्मद युनूस यांची प्रधानमंत्री मोदी यांना ग्वाही

बांगलादेशातल्या हिंदू आणि सर्व अल्पसंख्य़ांकांना संरक्षण दिलं जाईल, अशी ग्वाही बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार महम्मद युनूस यांनी दिली आहे. त्यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि सद्य स्थितीबाबत चर्चा केली. आपापल्या राष्ट्रीय प्राधान्यांच्या अनुषंगानं उभयपक्षी संबंध पुढं नेण्याच्या मार्गांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. लोकशाहीवादी, स्थिर, शांततापूर्ण, आणि प्रागतिक बांगला देशासाठी भारताचा पाठिंबा कायम राहील, असं मोदी यांनी सांगितलं.

August 16, 2024 7:19 PM

views 24

बांग्लादेशातील अत्याचारांच्या विरोधात पुकारलेल्या बंदला राज्यात हिंसक वळण

बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्यात काही धार्मिक संघटनांनी बंद पुकारला होता. त्याला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं.   नाशिकमध्ये काही दुकानदारांनी बंदला विरोध केल्यानंतर दुकान बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. यावेळी आंदोलकांनी काही दुकानांची तोडफोड केली. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह काही जण जखमी झाले. पोलिसांनी अश्रुधूराचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या नाशिक शहरात तणावपूर्ण शांतता असून संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. &nbsp...

August 11, 2024 1:27 PM

views 22

बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांचा राजीनामा

न्यायव्यवस्थेत सुधारणा करायच्या मागणीसाठी बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात विद्यार्थी, अधिवक्ता आणि इतरांनी केलेल्या निदर्शनानंतर बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी काल राजीनामा दिला. बांगलादेशचे कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज सल्लागार प्राध्यापक आसिफ नजरुल यांनी समाजमाध्यमावरून ही माहिती दिली. राजीनामा पत्र कायदा मंत्रालयाकडे पोहोचलं असून, ते विनाविलंब राष्ट्रपतींना पाठवलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.   काल, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात विद्यार्थी, अधिवक्ता आणि इतर जमा ...

August 11, 2024 1:24 PM

views 19

बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनूस यांनी अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांचा निषेध केला

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेते, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी देशातल्या अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. सर्व हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्यांकांचं  संरक्षण करायला हवं, असं आवाहन त्यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.   दरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाका आणि ईशान्येकडच्या चटग्राम इथं काल सलग दुसऱ्या दिवशी तिथल्या हजारो अल्पसंख्याक हिंदूंनी आपल्या विविध मागण्यांसाठी  आंदोलन केलं. अल्पसंख्याकांच्या खटल्यांना वेग देण्यासाठी विशेष लवाद स्थापन करणं, अल्पसंख्याकांसा...

August 9, 2024 2:24 PM

views 18

बांगलादेश हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून डॉ. मोहम्मद युनूस यांनी घेतली शपथ

बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून काल नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांनी शपथ घेतली. बांगलादेशाचे राष्ट्रपति महंमद शाहबुद्दीन यांनी त्यांना ढाका इथ वंग भवन इथ पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   मोहम्मद युनूस यांचा जन्म 28 जून 1940 रोजी झाला. ते बांगलादेशातील नामवंत उद्योगपती, बँकर आणि अर्थतज्ञ आहेत. ग्रामीण बँकेची स्थापना करून सूक्ष्म पातळीवर कर्ज आणि अर्थपुरवठा याबाबत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल 2006 मध्ये त्यांचा नोबेल पुरस्क...

August 8, 2024 3:15 PM

views 20

बांगलादेशात कापसाच्या वाढत्या मागणीमुळे कापूस निर्यातीत वाढ

बांगलादेशात कापसाच्या वाढत्या मागणीमुळे भारताच्या कापूस निर्यातीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. बांगलादेशातल्या सूत गिरण्यांमध्ये कापसाची मागणी वाढत असल्यामुळे भारताची कापूस निर्यात दोन तृतीयांश टक्के वाढणार आहे. या वर्षी २६ लाख गाठी इतकी निर्यात होईल, असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. भारतातून बांगलादेशाला दर महिन्याला एक ते दीड लाख गाठी इतकी निर्यात केली जाते.

August 8, 2024 3:11 PM

views 19

बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळं कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळं महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निर्यात पुन्हा सुरू होईल.   बांगलादेशातली कांद्याचा सर्वात जास्त पुरवठा भारतातून होतो. महाराष्ट्रातल्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतून सर्वाधिक कांदा निर्यात होतो. सध्या राजकीय अस्थिरतेमुळे ७० ट्रक सीमेवर अडकले होते. त्यातल्या काहींना परवानगी मिळाल्यानं ते बांगलादेशात पोहोचले आहेत. मात्र, परिस्थिती आटोक्यात आली नाह...

August 7, 2024 1:24 PM

views 27

बांगलादेशाच्या हंगामी प्रधानमंत्रीपदी मोहम्मद युनुस यांची नियुक्ती

बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी तिथली संसद बरखास्त करुन हंगामी सरकारच्या प्रधानमंत्रीपदी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांची नेमणूक केली आहे. लष्कराच्या तिनही दलांचे प्रमुख आणि विद्यार्थी संघटनांच्या शिष्टमंडळासोबत काल झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मोहम्मद युनुस यांनी ग्रामीण बँकांच्या माध्यमातून गरीबीविरोधी मोहीम राबवल्याबद्दल २००६ मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.   सरकारमधल्या अन्य मंत्र्यांची निवड विविध राजकीय पक्षांश...