August 6, 2024 7:12 PM

views 23

बांगलादेशातल्या आंदोलकांकडून मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

बांगलादेशातल्या आंदोलकांनी हंगामी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आंदोलकांनी नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केल्याची माहिती आंदोलन समितीचे समन्वयक नाहिद इस्लाम यांनी समाज माध्यमावर शेअर केलेल्या व्हिडिओमधून दिली. प्रधानमंत्री शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती  मोहम्मद शहाबुद्दीन यांनी हंगामी सरकार स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला.

August 6, 2024 7:09 PM

views 26

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षीतता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

बांगलादेशातल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.  बांगलादेशातल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयानं तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.   यासाठी बांगलादेशात असलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांची यादी परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आली असून, तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासा...

August 6, 2024 3:39 PM

views 16

बांगलादेशातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारची सर्वपक्षीय बैठक

बांगलादेश मधल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज या मुद्द्यावर सर्व नेत्यांना माहिती दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते.   दरम्यान, बांगलादेशच...

August 6, 2024 3:36 PM

views 22

बांगलादेशात लष्कर आणि राजकीय नेत्यांनी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं संयुक्त राष्ट्रांचं आवाहन

बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर तिथल्या लष्करी आणि राजकीय अधिकाऱ्यांनी देशात शांततापूर्ण लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन काम करावं, असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे. बांगलादेशच्या नागरिकांचे लोकशाही आणि मानवी हक्क अबाधित राहावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

August 6, 2024 1:40 PM

views 26

बांग्लादेशातल्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, युनायटेड किंगडमची मागणी

बांग्लादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, अशी मागणी युनायटेड किंगडमच्या सरकारनं केली आहे. बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या निवासस्थानामध्ये घुसून काल आंदोलकांनी तोडफोड केली. त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लष्करी विमानातून देश सोडला. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये शांतता आणि लोकशाही कायम राहायला हवी, असं युकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी काल सांगितलं. बांगलादेशात गेल्या दोन आठवड्यांमध्ये अभूतपूर...

August 5, 2024 7:13 PM

views 34

बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांचा राजीनामा

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगला देशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ढाक्यातलं प्रधानमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान गोनोभवनवर आज शेकडो आंदोलकांनी हल्ला केला. त्यानंतर शेख हसीना देश सोडून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी निघून गेल्याचं वृत्त आहे. देश चालवण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल, असं बांगलादेशाचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी म्हटलं आहे. दूरचित्रवाणी वरून संबोधित करताना त्यांनी देशवासियांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन क...

August 5, 2024 1:30 PM

views 34

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं – परराष्ट्र मंत्रालय

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. बांग्लादेशातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं ही सूचना केली आहे. सध्या बांग्लादेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी आणि राहतं ठिकाण सोडणं टाळावं तसंच ढाक्यातल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

August 5, 2024 12:14 PM

views 39

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक

बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी निदर्शक, आंदोलक, पोलिस आणि सत्ताधारी पक्ष समर्थक संघटनांच्या कार्यकर्त्यांदरम्यान काल झालेल्या संघर्षाला हिंसक वळण लागलं. त्यात 13 पोलिस कर्मचाऱ्यांसह 90 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांनी काल राष्ट्रव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं असून, शेख हसीना सरकारच्या राजीनाम्याची मागणीचा आग्रह धरला आहे. सरकारनं काल ढाका आणि देशातल्या अन्य भागात अनिश्चित काळासाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. सरकारनं आंदोलकां...

August 3, 2024 12:40 PM

views 24

बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलकांच्या झालेल्या हत्यांच्या विरोधात उद्यापासून देशभरात असहकार आंदोलन

बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलकांच्या झालेल्या हत्यांच्या विरोधात आणि त्यांनी मांडलेल्या नऊ मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी उद्यापासून देशभरात असहकार आंदोलन पुकारलं आहे. यात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं आहे. तसंच आजही देशात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. भेदभावविरोधी विद्यार्थी चळवळीच्या दोन समन्वयकांनी विविध समाजमाध्यमांवरून काल ही घोषणा केली. जवळपास दोन आठवड्यांनंतर काल राजधानी ढाकासह विविध ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्यात झालेल्या संघर्षात दोन जणांचा मृत्य...

July 25, 2024 8:41 PM

views 33

बांगलादेशातून आतापर्यंत ६,७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

बांगलादेशातून आतापर्यंत ६ हजार ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी भारतात परतले असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली. ढाकामधल्या भारतीय उच्चायुक्तांनी भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित प्रवासाची व्यवस्था भारत बांग्लादेश सीमेपर्यंत तसंच विमानतळापर्यंत केली आहे, विद्यार्थ्यासाठी चोवीस तास संपर्क यंत्रणा कार्यरत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.