November 15, 2024 8:19 PM

views 26

भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेशपर्यंत विद्युतप्रवाह सुरू

भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेशापर्यंत विद्युतप्रवाह आज सुरू झाला. बांगलादेशाच्या ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार मोहम्मद फौजुल कबीर खान आणि नेपाळचे ऊर्जा मंत्री दीपक खडका यांच्यासमवेत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी पहिल्या 40 मेगावॅटपर्यंतच्या विद्युतप्रवाहाचं उद्घाटन केलं. त्यामुळे भारत, नेपाळ आणि बांगलादेश यांच्या ऊर्जा सहकार्याला एक नवा आयाम मिळाला आहे, असं ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे.

October 13, 2024 3:23 PM

views 46

भारताचं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, सुरक्षितत करण्याचे आवाहन

भारतानं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, विशेषत: सणासुदीच्या काळात सुरक्षितता आणि सुरक्षा करण्याचे आवाहन केलं आहे. एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानं ढाका येथील तंतीबाजार येथील पूजा मंडपावर झालेला हल्ला आणि सातखीरा येथील पूजनीय जेशोरेश्वरी काली मंदिरात झालेल्या चोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले खेदजनक असून मंदिरे आणि देवतांची विटंबना आणि नुकसान जाणीवपूर्वक केलं जात असल्याचं भारतानं म्हटलं आहे.    

October 10, 2024 9:00 AM

views 44

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतानं 86 धावांनी जिंकला

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्ध दिल्ली इथं दुसरा सामना भारतानं 86 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 222 धावांचं उद्दिष्ट गाठताना पाहुणा संघ वीस षटकांत 9 बाद 135 धावा करु शकला. उभय संघांचा तिसरा सामना शनिवारी हैदराबाद इथं होणार आहे.

October 1, 2024 3:52 PM

views 24

बांगलादेशविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं जिंकली

बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आज भारतानं जिंकला. बांग्लादेशाकडून मिळालेलं ९५ धावांचं आव्हान भारतानं ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतानं ही मालिका २-० अशी जिंकली. यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर. अश्विन मालिकावीर ठरला.    पाचव्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपला. जसप्रित बुमराह, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यशस्वी जयस्वालच्या ५१ आणि विराट कोहलीच्या नाबाद २९ धावांच्या बळावर भारतानं हा सामना जिंकला.

September 20, 2024 12:20 PM

views 20

बांगलादेश : लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीची चिंता

लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या मोहंमद युनूस यांच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीनं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे नव्या समस्या निर्माण होतील असं पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फक्रुल इस्लाम आलमगीर यांनी म्हटल आहे. या निर्णयाचा फेर विचार करण्याचं आवाहन त्यांनी हंगामी सरकारला केलं आहे. प्रशासनाला कायदा आणि सुव्यस्था राखण्यात अपयश आल्याचं यामुळे दिसून येत असल्याचा दावा आलमगीर यांनी केला आहे.

September 19, 2024 7:23 PM

views 42

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारताच्या ६ गडी गमावून ३३९ धावा

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेत आज चेन्नई इथं सुरु झालेल्या पहिल्या सामन्यात दिवसअखेर भारतानं ६ गडी गमावून ३३९ धावा केल्या. आर आश्विननं आज नाबाद शतक झळकावलं. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता.  मात्र भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैसवालनं ५६ धावा केल्या. पण कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ६ धावा करुन बाद झाले. तर शुभमन गिल शून्यावर बाद झाला. ऋषभ पंतनं ३९, तर के एल राहुलनं १६ धावा केल्या. भारताची स्थिती ६ बाद १...

September 8, 2024 1:54 PM

views 19

बांगलादेशाचं ‘आमार शोनार बांग्ला’ हे राष्ट्रगीत बदलण्यात येणार नाही – बांगलादेश हंगामी सरकार

बांगलादेशाचं ‘आमार शोनार बांग्ला’ हे राष्ट्रगीत बदलण्यात येणार नाही, असं बांगलादेशाच्या हंगामी सरकारनं स्पष्ट केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रगीत बदलण्याची मागणी देशातल्या कट्टरतावादी संघटनांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रगीत बदलणार नसल्याचं स्पष्ट करत सरकारनं सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. बांगलादेश जमात ए इस्लामीचे माजी अमीर गुलाम आजम यांचे पुत्र अब्दुल्लाहिल अमान आजमी यांनी राष्ट्रगीत बदलण्याची मागणी केली होती. या राष्ट्रगीतात बंगालच्या पूर्व आणि पश्चिम अश...

August 28, 2024 6:46 PM

views 69

बांगलादेशने जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबीरवरील बंदी उठवली

बांगलादेश मध्ये, मुहम्मद युनूस यांच्या हंंगामी सरकारनं आज जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबीर या विद्यार्थी संघटनेवरची बंदी उठवली आहे. बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबीर यांचा दहशतवाद आणि हिंसाचारात सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा उल्लेख या अधिसूचनेत करण्यात आला आहे. म्हणून, दहशतवाद विरोधी कायदा, २००९ च्या कलम १८ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत, सरकारनं जमात, शिबीर आणि त्याच्या प्रमुख संघटनांवर बंदी घालणारं प...

August 28, 2024 3:41 PM

views 36

बांगलादेशामध्ये अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचारांच्या विरोधात धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन

बांगलादेशामध्ये अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचारांच्या विरोधात धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात अनेक लोक सहभाग झाले होते. शहरातल्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. बांगलादेशातले अत्याचार थांबावेत यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना घडली त्या संदर्भातही मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिलं.

August 27, 2024 9:28 AM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात युक्रेन आणि बांगलादेशातल्या परिस्थितीवर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी युक्रेनमधील स्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यो बायडन यांनी भारत-अमेरिका सर्वंकष जागतिक भागीदारीसाठी दाखवलेल्या बांधिलकीबद्दल प्रधानमंत्री मोदींनी यावेळी त्यांची प्रशंसा केली. उभय देशांमधली ही भागीदारी लोकशाही, कायद्याचं राज्य या समान मूल्यांवर आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये असलेल्या परस्पर दृढ संबंधांवर आधारित आहे. या चर्चेवेळी मोदी आणि बायडन यांनी द्विपक्षी संबंधांमध्ये झालेल्या लक्षणीय प्रगती...