October 13, 2025 8:03 PM

views 55

रेल्वे पोलीस दलातली भरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भर्ती केली जाईल, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. गुजरातमध्ये वलसाड इथे रेल्वे पोलीस दलाच्या एकेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरपीएफशी संबंधित विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांकडे आता अत्याधुनिक उपकरणं दिली जातील, तसंच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांना प्रगत प्रशिक्षण दिलं जाईल, अशी घोषणाही रेल्वे मंत्र्यांनी यावेळी के...

September 11, 2025 2:37 PM

views 23

बडगामपासून ते आदर्श नगर पर्यंत पार्सल वाहून नेणारी एक विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार- रेल्वे मंत्री

जम्मू-काश्मीरमध्ये बडगामपासून ते दिल्लीतल्या आदर्श नगर स्थानकापर्यंत पार्सल वाहून नेणारी एक विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.   या रेल्वेतून फळे आणि हस्तकला विक्रेत्यांना त्यांची उत्पादनं देशभरात पोहोचवता येतील, असं वैष्णव आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.

August 29, 2025 11:22 AM

views 18

देशातल्या पहिल्या सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाचं गुजरातमध्ये उद्घाटन

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काल गुजरातमधल्या अहमदाबादजवळील साणंद इथं सीजी पॉवरच्या पहिल्या बाह्यकंत्राटी जुळवणी आणि चाचणी सुविधेच्या पहिल्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या प्रसंगी बोलताना, भारतातील सेमीकंडक्टर उद्योगासाठी हा एक मैलाचा दगड असल्याचं सांगत या प्रकल्पामध्ये पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप तयार केली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.   2032 पर्यंत कुशल सेमीकंडक्टर व्यावसायिकांची जागतिक कमतरता एकी...

July 31, 2025 10:10 AM

views 13

भारत करणार येत्या कृत्रिम बुद्धीमत्ता प्रभाव शिखर परिषदेचं आयोजन

पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या कृत्रिम बुद्धीमत्ता प्रभाव शिखर परिषदेचं आयोजन भारत करणार आहे. केंद्रिय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल संसदेत ही माहिती दिली.   आरोग्य, शिक्षण, कृषी, हवामान बदल आणि प्रशासन यासारख्या वास्तव जगातल्या समस्यांचा सामना करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर या संकल्पनेवर परिषदेत भर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.   कृत्रिम बुद्धीमत्तेशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचं काम सरकार करत आहे. यामध्ये ग्...

July 19, 2025 1:40 PM

views 22

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू आहे, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं.   हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्याकडे लक्ष वेधून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन केलं. सेमीकंडक्टर क्षेत्रात सुरू असलेल्या कामाबद्दल ते म्हणाले. 

July 19, 2025 9:19 AM

views 20

देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप या वर्षी तयार केली जाणार

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप या वर्षी तयार केली जाईल असं काल जाहीर केलं. हैदराबाद इथं केशव मेमोरियल एज्युकेशनल सोसायटीच्या 85 व्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते.   ते म्हणाले की, सरकारन सहा सेमीकंडक्टर प्लांटना यापूर्वीच मान्यता दिली आहे आणि त्यांचं बांधकाम सुरू आहे. इंडिया एआय मोहिमेचा भाग म्हणून, मोफत डाटासेट आणि इतर साधनं अपलोड केली जात आहेत. विकसित देशांतील विद्यार्थी शैक्षणिक संधींसाठी भारतात येतील त...

July 1, 2025 8:39 PM

views 20

‘रेलवन अ‍ॅप’चं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘रेलवन अ‍ॅप’चं उद्घाटन केलं. अनारक्षित तिकीट काढणं, रेल्वेगाड्यांची चौकशी, प्रवास नियोजन, मदत सेवा आणि खानपान सेवा या सेवा या अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिमच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्यांनी याबद्दल माहिती दिली.   रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड प्लेस्टोअर आणि आयओएस अ‍ॅप स्टोअरवर...

May 30, 2025 8:02 PM

views 23

इंडिया एआय मिशनमध्ये लक्षणीय प्रगती-अश्विनी वैष्णव

इंडिया एआय मिशनमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं  इंडिया एआय मिशन - मेक एआय इन इंडिया आणि मेक एआय फॉर इंडिया  या कार्यक्रमात ते बोलत होते.  या वेळी  वैष्णव यांनी एआय कॉम्प्युट सर्व्हिसेस एम्पॅनेलमेंटच्या दुसऱ्या फेरीचीही  घोषणा केली. 

May 29, 2025 8:50 PM

views 22

पहिली भारतीय बनावटीची सेमी कंडक्टर चिप यावर्षी बाजारात आणली जाईल

पहिली भारतीय बनावटीची सेमी कंडक्टर चिप यावर्षी बाजारात आणली जाईल, अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. ते CII अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते. या चिपचा उपयोग ऑटोमेटिव्ह, टेलिकॉम तसंच ट्रेनमध्ये वापरली जाते. 

May 3, 2025 7:19 PM

views 27

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते हडपसर जोधपुर एक्सप्रेसचं उद्घाटन

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज हडपसर जोधपुर एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल - भगत की कोठी एक्सप्रेसचं  उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गजेंद्र सिंह शेखावत, खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तर केंद्रीय मंत्री एल मुरुगन दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.   तत्पूर्वी अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला भेट द...