November 17, 2025 1:09 PM November 17, 2025 1:09 PM

views 18

केंद्रिय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आज उत्तर विभागीय मंडळाची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली हरियाणामधे फरिदाबाद इथं एन झेड सी अर्थात उत्तर विभागीय परिषदेची बैठक सुरू आहे. हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि चंडीगड या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश एन झेड सी मधे होतो.   या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. बैठकीच्या सुरुवातीला दिल्ली स्फोटात मरण पावलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यांमधे परस्पर समन्वय, पाणी प्रश्न आणि विकासकामं या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होत आह...

October 31, 2025 3:14 PM October 31, 2025 3:14 PM

views 55

देशाला एकसंध राखण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान-अमित शहा

भारतीय स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध राखण्यात आणि आजच्या भारताच्या निर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त नवी दिल्लीत आयोजित रन फॉर यूनिटीला त्यांनी आज प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौड, पदयात्रासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार क...

October 16, 2025 6:56 PM October 16, 2025 6:56 PM

views 34

सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी यंत्रणा विकसित करणं सुरू – केंद्रीय गृहमंत्री

भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या विरोधात सरकारनं शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारलं आहे, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. नवी दिल्लीत ते आज प्रत्यार्पण आव्हाने आणि रणनीती संबंधीच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी एक मजबूत यंत्रणा विकसित केली जात असल्याचं ते म्हणाले. या परिषदेविषयी शहा म्हणाले.   सरकारनं २०१८मध्ये फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार देणारा फरार आर्थिक गुन्हेगार कायदा आणल्यानंतर पुढच्या च...

October 13, 2025 10:30 AM October 13, 2025 10:30 AM

views 40

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानच्या एका दिवसाच्या भेटीवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानच्या एका दिवसाच्या भेटीवर जयपूर इथं जाणार आहेत. तीन नवीन फौजदारी कायदे लागू होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे, त्यानिमित्त जयपूरमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्याचं उद्घाटन अमित शहा करणार आहेत   आजपासून सुरू होणाऱ्या 6 दिवसांच्या या प्रदर्शनात या तीन फौजदारी कायदयांमधील तरतूद आणि राजस्थानमध्ये त्यांची झालेली अंमलबजावणी दर्शवण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर शहा जनतेला संबोधित करतील. रायझिंग राजस्थान ग्लोबल इनव्हेस्टमेंट समिट 2024 अंतर्गत म...

September 28, 2025 7:38 PM September 28, 2025 7:38 PM

views 27

नक्षलवादी चळवळ पुढच्या वर्षीपर्यंत संपुष्टात येईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अकरा वर्षांआधी जम्मू काश्मीरमधली फुटीरतावादी चळवळ, नक्षलवादी चळवळ आणि ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळ हे तीन अंतर्गत धोके सर्वात मोठे होते. मात्र रालोआ सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही ठिकाणच्या फुटीरतावादी चळवळी मोडून पडल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं श्यामाप्रसाद मुखर्जी भारत मंथन २०२५ या कार्यक्रमात बोलत होते. आज ईशान्य भारतात मोठं परिवर्तन झालं असून हा भाग भारताच्या मुख्य भूमीच्या अधिक जवळ आला आहे, नक्षलवादी चळवळ पुढच्या वर्षीपर्यंत संपुष्टात येईल असं...

September 26, 2025 11:22 AM September 26, 2025 11:22 AM

views 20

बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावं – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचं आवाहन

केंद्राचा 'मेक इन इंडिया अभियानाचा दूसरा टप्पा पुढील २५ वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग असलेल्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल एका पुरस्कार सोहळ्यात शाह बोलत होते. बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. गेल्या १० वर्षांत गरिबातील गरिबांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५३ कोटी बँक खाती उघडण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

September 26, 2025 9:34 AM September 26, 2025 9:34 AM

views 64

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्याची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळं झालेलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यासाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारं सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना दिलं आहे. याबाबत केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवला जाईल, असंही या निवेदनात म्हटलं आहे. कालपर्यंत 17 लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून, लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघेल, असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात दिलं. पडलेली घरं,...

August 24, 2025 3:38 PM August 24, 2025 3:38 PM

views 41

अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचं अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्घाटन

स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्वाचं असून विठ्ठलभाई पटेल यांनी भारतीय संकल्पनांवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं, अस केंद्रीय गृहमंती अमित शाह यांनी म्हटलं आहे.  त्यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उदघाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्वाचं असून विधिमंडळं ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी असं ते म्हणाले.    देशाच्या केंद्रीय का...

July 19, 2025 10:57 AM July 19, 2025 10:57 AM

views 11

प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु- अमित शहा

देशातल्या प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. 21व्या जागतिक पोलिस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते. गेल्या दहा वर्षात देशात खेळांना खूप महत्त्व देण्यात आलं असून त्यासाठी अर्थसंकल्पातील तरतूदही पाच पटीनं वाढवण्यात आल्याचं शहा म्हणाले. सरकार 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी तीन हजारपेक्षा अधिक खेळाडूंना दरमहा पन्नास हजारांची मदत करत...

July 6, 2025 8:15 PM July 6, 2025 8:15 PM

views 24

देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांचं योगदान महत्त्वपूर्ण – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाला चार वर्ष झाल्याबद्दल गुजरातमध्ये आणंद इथं अमूल आणि ‘एनडीडीबी’ अर्थात, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करताना शाह बोलत होते. दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारिता विद्यापीठ, अन्नधान्य उत्पादन आणि विक्रीशी संबंधित तीन सहकारी संस्था आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित तीन सहकारी संस्था एकत्रितपणे देशाच्या सहकारी चळवळीला अधिक बळकटी देतील...