डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 6, 2025 8:15 PM | Amit Shah

printer

देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांचं योगदान महत्त्वपूर्ण – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाला चार वर्ष झाल्याबद्दल गुजरातमध्ये आणंद इथं अमूल आणि ‘एनडीडीबी’ अर्थात, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करताना शाह बोलत होते. दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारिता विद्यापीठ, अन्नधान्य उत्पादन आणि विक्रीशी संबंधित तीन सहकारी संस्था आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित तीन सहकारी संस्था एकत्रितपणे देशाच्या सहकारी चळवळीला अधिक बळकटी देतील असे ते म्हणाले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आणि म्हणाले की, त्यांच्याशिवाय काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला नसता. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाचा स्थापना दिन हे औचित्य साधत सोलापूरात आज सहकार रॅली झाली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा