May 29, 2025 3:10 PM May 29, 2025 3:10 PM
10
सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी
ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये उच्चस्तरीय बैठका घेत आहेत. डीएमके खासदार के कन्निमोळी यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने काल ग्रीसचे परराष्ट्र उपमंत्री, परराष्ट्र मंत्रालयातले उच्चाधिकारी आणि महत्वाच्या व्यक्तींची भेट घेतली. दहशतवादी आणि त्यांना सहाय्य किंवा आश्रय देणारे यांच्यामध्ये फरक करता कामा नये ही भारताची भूमिका त्यांनी मांडली. भाजपा खासदार रवीशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रोममध्ये...