डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळं आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोहोचलं. सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जपानमधले त्यांचे कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, हे शिष्टमंडळ आता ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादा विरुद्ध भारताची भूमिका इंडोनेशियच्या नेतृत्वासमोर मांडणार आहे. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया सरकारचे सदस्य, राजकीय पक्षांचे नेते, आसियानचे सरचिटणीस यांची भेट घेणार आहे.

द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ काल ग्रीसमध्ये पोहोचलं. ग्रीसचा दौरा संपल्यानंतर हे शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देण्यासाठी लाटविया आणि स्पेनला भेट देईल.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काँगोच्या राष्ट्रीय सभेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष बर्थोल्ड उलुंगू यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ काल दक्षिण आफ्रिकेत पोहचलं.

फ्रान्समध्ये, भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काल फ्रेंच संसद सदस्यांची भेट घेतली.काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पनामाला पोहोचलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा