September 28, 2025 7:54 PM September 28, 2025 7:54 PM

views 164

सेवा पर्व या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेविषयी

देशाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने २०१८ ला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. याची सुरवात २४ फेब्रुवारी २०१९ पासून झाली. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते.... होल्ड बाईट मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशातल्या सर्वात मोठ्या कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्य...

June 9, 2025 8:29 PM June 9, 2025 8:29 PM

views 13

गेल्या अकरा वर्षांत केंद्र सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशानं विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर केलं आहे. गेल्या अकरा वर्षांत सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.    गेल्या ११ वर्षातल्या देशाच्या प्रगतीबाबत नमो ऍपवर घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

June 9, 2025 1:36 PM June 9, 2025 1:36 PM

views 15

१४० कोटी भारतीयांच्या सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं – प्रधानमंत्री

गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे तत्व अंगिकारून रालोआ सरकारने आर्थिक वाढीपासून ते सामाजिक उन्नतीपर्यंतची मजल मारली आहे.   गेल्या अकरा वर्षांत सरकारने लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. जनधन योजनेतून ५५ कोटी ...