गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशानं विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर केलं आहे. गेल्या अकरा वर्षांत सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
गेल्या ११ वर्षातल्या देशाच्या प्रगतीबाबत नमो ऍपवर घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.