June 17, 2025 3:54 PM

views 10

११ वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेसाठी भरीव उपाययोजना

गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात केंद्रसरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी भरीव उपाययोजना केल्या आहेत. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारताने गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. त्यात प्रामुख्याने भारताच्या आरोग्य सेवेचा समावेश आहे. आयुष्मान भारतसारख्या प्रमुख उपक्रमांनी जवळजवळ ५५ कोटी लोकांना आर्थिक संरक्षण दिलं आहे.   आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत ७० वर्षं आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य हमीचे योजनेचे फायदे देण्यात आले आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशनने ...

June 10, 2025 1:11 PM

views 13

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात भारतानं विकास आणि सुशासन अनुभवलं – केंद्रीय मंत्री डॉ. एल. मुरुगन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत भारताने लक्षणीय विकास आणि सुशासन अनुभवल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केलं आहे. ते आज रालोआ सरकारच्या ११ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त पुद्दुचेरी इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जो देश भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाच्या युगात अडकला होता, त्या देशाला पारदर्शक आणि लोककेंद्री प्रशासनाच्या युगात नेण्याची कामगिरी गेल्या ११ वर्षांत सरकारने केल्याचं ते म्हणाले.   भारत आता जगातली चौथी सर्वात मोठी...

June 9, 2025 1:44 PM

views 19

मोदी सरकारने प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसादाला महत्त्व दिलं – केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाची राजकीय संस्कृती बदलली असून प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसाद याला महत्त्व दिलं असल्याचं भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज सांगितलं. मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. हे सरकार प्रभावी आणि खंबीर निर्णय घेणारं असून प्रशासनात पारदर्शकतेचं नवीन परिमाण या सरकारने प्रस्थापित केलं आहे असं ते म्हणाले. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने विकसित भारताचा पाया घातला अ...