डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मोदी सरकारने प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसादाला महत्त्व दिलं – केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाची राजकीय संस्कृती बदलली असून प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसाद याला महत्त्व दिलं असल्याचं भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज सांगितलं. मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. हे सरकार प्रभावी आणि खंबीर निर्णय घेणारं असून प्रशासनात पारदर्शकतेचं नवीन परिमाण या सरकारने प्रस्थापित केलं आहे असं ते म्हणाले. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने विकसित भारताचा पाया घातला असं ते म्हणाले. २०१४च्या आधीचं सरकार भ्रष्टाचारात अडकलं होतं असा आरोप करुन ते म्हणाले की त्यानंतर चित्र बदललं असून देशात आशावादी  वातावरण आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा