मानव-हत्ती संघर्षाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी, आसाम सरकार उच्च जोखीम असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये गज मित्र योजना सुरू करणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ८० संघर्षग्रस्त गावांमध्ये आठ स्थानिक सदस्यांसह समुदाय-आधारित जलद प्रतिसाद पथकं तैनात केली जातील.
हत्तींची स्थलांतर प्रक्रिया सुरक्षितपणे व्हावी त्याचबरोबर स्थानिक उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी, ही पथके तीव्र संघर्षांच्या महिन्यांत, विशेषतः भात लागवडीच्या हंगामादरम्यान काम करतील. या वर्षी १ ऑक्टोबरपासून गावप्रमुखांचे मानधन ९,००० रुपयांवरून १४,००० रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्तावही आसाम मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.