July 11, 2025 9:51 AM

views 17

कावड यात्रेला आजपासून सुरुवात

उत्तर भारतात, पवित्र श्रावण महिन्यात होणाऱ्या वार्षिक कावड यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या तीर्थयात्रेदरम्यान, लाखो भाविक गंगा नदीचे पवित्र जल गोळा करण्यासाठी उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री सारख्या पवित्र स्थळांना जातात. या यात्रेकरूंच्या व्यवस्थापनासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने मोठ्या प्रमाणावर नियोजन केले आहे. 

July 11, 2025 9:36 AM

views 26

मानव-हत्ती संघर्षाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी, आसाम सरकारची गज मित्र योजना

मानव-हत्ती संघर्षाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी, आसाम सरकार उच्च जोखीम असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये गज मित्र योजना सुरू करणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ८० संघर्षग्रस्त गावांमध्ये आठ स्थानिक सदस्यांसह समुदाय-आधारित जलद प्रतिसाद पथकं तैनात केली जातील.   हत्तींची स्थलांतर प्रक्रिया सुरक्षितपणे व्हावी त्याचबरोबर स्थानिक उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी, ही पथके तीव्र संघर्षांच्या महिन्यांत, विशेषतः भात लागवडीच्या हंगामादरम्यान काम करतील. या वर्षी १ ऑक्टोबरपासून गावप्रमुखांचे मानधन ९,०००...