पोलंड मधल्या चोरझो इथं झालेल्या जानुझ कुसोसिन्की मेमोरियल मीट – २०२५ मध्ये भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं ८४ पूर्णांक १४ मीटर भालाफेकीसह आज दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवलं. जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं ८६ पूर्णांक १२ मीटर भालाफेक करून सुवर्ण पदक, तर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यानं कांस्य पदक पटकावलं.