October 22, 2025 3:25 PM

views 124

भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात पदोन्नती

 ऑलिंपिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथे हा समारंभ झाला. त्यांनी नीरज चोप्रा याच्या लष्करी गणवेशावर नवीन पदाचं चिन्ह लावून त्याला अधिकृतपणे बढती दिली.   ऑगस्ट २०१६मध्ये चोप्रा याला भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू करण्यात आलं होतं. त्याला मिळालेल्या अर्जुन पुरस्कार आणि खेल...

August 18, 2025 1:41 PM

views 32

भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा डायमंड लीगमधे प्रवेश निश्चित

विद्यमान विश्वविजेता आणि दोनवेळा ऑलिम्पिक पदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं डायमंड लीगच्या अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमध्ये ही स्पर्धा होईल.   नुकत्याच झालेल्या सिलेसिया लीगमध्ये त्यानं भाग घेतला नसला, तरी या हंगामातली त्याची कामगिरी उत्तम असल्यामुळे तो डायमंड लीगसाठी पात्र ठरला. अँडरसन पीटर्स आणि लुईज मॉरिशिओ दा सिल्वा यांच्यासारखे त्याचे प्रतिस्पर्धीही या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत. नीरज चोप्रा यानं २०२२ मध्ये डायमंड लीगच...

May 24, 2025 3:42 PM

views 28

Janusz Kusociński Memorial : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक

पोलंड मधल्या चोरझो इथं झालेल्या जानुझ कुसोसिन्की मेमोरियल मीट - २०२५ मध्ये भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं ८४ पूर्णांक १४ मीटर भालाफेकीसह आज दुसरा क्रमांक पटकावत रौप्य  पदक मिळवलं. जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं ८६ पूर्णांक १२ मीटर भालाफेक करून सुवर्ण पदक, तर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यानं कांस्य पदक पटकावलं.  

May 17, 2025 1:29 PM

views 24

दोहा डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्यपदक

दोहा डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं दुसरे स्थान पटकावलं. त्यानं ९० पूर्णांक २३ मीटरच्या विक्रमी अंतरापर्यंत भालाफेक करण्यात यश मिळवलं. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं ९१ पुर्णांक ६ शतांश मीटर अंतरावर फेक करत पहिलं स्थान पटकावलं.   नीरजनं त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला. ९० मीटरचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं. ही सर्वोत्तम कामगिरी नीरजचं समर्पण, शिस्त आणि खेळाप्रति प्रेमाचा परिणाम असल...

September 15, 2024 1:39 PM

views 53

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चौप्राला रौप्य पदक

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीगचं सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक नीरज चोप्रानं पटकावलं. नीरजनं ८७ पूर्णांक ८६ मीटर अंतरावर भाला फेकला, त्याचं सुवर्णपदक केवळ एका सेंटीमीटरनं हुकलं. या स्पर्धेत अँडरसन पीटर्स सुवर्ण तर जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं कांस्य पदक पटकावलं.

September 13, 2024 10:18 AM

views 33

नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे डायमंड लीग फायनलमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

ब्रुसेल्स इथं आजपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहेत. यंदा डायमंड लीगमधील अलियान्झ मेमोरियल व्हॅन डॅमे स्पर्धेत हे क्रिडापटू विजयासाठी लढत देतील. सध्या 14व्या क्रमांकावर असलेला भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे आज डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पदार्पण करेल. त्याचा सामना इथिओपियाचे सॅम्युअल फायरवू, गेटनेट वले, केनियाचे आमोस सेरेम आणि अब्राहम किबिवोट यांच्याशी होईल, तर स...

August 23, 2024 10:06 AM

views 44

लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर

भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. नीरजने ८९ पूर्णांक ४९ मीटर अंतरावर भालाफेक करत या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.   [video width="644" height="360" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/08/vwMTIVaZyOpazx2f-1.mp4"][/video]

August 9, 2024 6:05 PM

views 55

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यांना रौप्यपदक

पॅरिस ऑलिम्पिकच्या कालच्या दिवशी भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यानं रौप्यपदकावर नाव कोरलं, तर पुरुष हॉकी संघानं कांस्यपदकाला गवसणी घातली. या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे. संपूर्ण देशाला नीरजचा अभिमान आहे आणि त्याच्या कामगिरीमुळे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी त्याची प्रशंसा केली. नीरजनं नेहमीच त्याची प्रतिभा दाखवून दिली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत...

August 8, 2024 12:42 PM

views 26

पॅरिस ऑलिंपिकमध्ये आज नीरज चोप्रा पुन्हा मैदानात उतरणार

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पुन्हा आपलं जेतेपद कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.   तर पुरुष हॉकी संघाची कास्य पदकासाठी स्पेन बरोबर लढत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार नीरज चोप्राचा सामना रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल. तर पुरुष हॉकी संघाचा सामना संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.   कुस्ती मध्ये अमन सहरावत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात तर अंशु महिलांच्या ५७ किलो वजनी गटात, फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात मैदान...

August 6, 2024 7:04 PM

views 20

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचा अंतिम फेरीत प्रवेश

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. पात्रता फेरीत ब गटातून पहिल्याच प्रयत्नात त्यानं ८९ पूर्णांक ३४ शतांश मीटर इतका लांब भाला फेकला. या हंगामातली नीरजची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.  महिलांच्या ५० किलो वजनी गटातल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटनं उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं तिचं स्वप्न कायम आहे. विनेशनं उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओकसाना लिवाच हिला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीत विन...