नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरू असलेला 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आजपासून सर्वसामान्य लोकांसाठी उघडणार आहे. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ अशी यावर्षीच्या मेळ्याची मध्यवर्ती सकंल्पना आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहार ही भागीदार राज्यं आहेत, तर झारखंड केंद्रस्थानी आहे.
या मेळ्यात 30 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश आणि 60 हून अधिक मंत्रालयं सहभागी होत आहेत. भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे प्रशासन महाव्यवस्थापक शंकरा नंद भारती यांनी आकाशवाणीला सांगितलं की, पर्यटकांच्या सोयीसाठी मेळ्यात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.