November 19, 2025 10:36 AM

views 53

नवी दिल्लीतील 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आजपासून सर्वसामान्य लोकांसाठी उघडणार

नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरू असलेला 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आजपासून सर्वसामान्य लोकांसाठी उघडणार आहे. 'एक भारत-श्रेष्ठ भारत' अशी यावर्षीच्या मेळ्याची मध्यवर्ती सकंल्पना आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहार ही भागीदार राज्यं आहेत, तर झारखंड केंद्रस्थानी आहे.   या मेळ्यात 30 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश आणि 60 हून अधिक मंत्रालयं सहभागी होत आहेत. भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे प्रशासन महाव्यवस्थापक शंकरा नंद भारती यांनी आकाशवाणीला सांगितलं की, पर्यटकांच्या ...

October 26, 2025 12:53 PM

views 22

राजधानी दिल्ली मधली हवेची गुणवत्ता खालावली

राजधानी दिल्ली मधली हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, आज सकाळी एक्यूआय, म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक 322  इतका नोंदवला गेला. शहराच्या अनेक भागांमध्ये तो ३५०  च्या पुढे गेल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलं आहे.  वातावरणात धुरकं भरल्यामुळे आज सकाळी राजधानीमध्ये ट्रकवर बसवलेल्या स्प्रिंकलर मधून पाण्याची फवारणी करण्यात आली. 

October 15, 2025 7:18 PM

views 34

दिल्ली आणि मुंबईच्या हवेत प्रदूषणकारी वायूंच्या पातळीत वाढ

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली कार्बन डायॉक्साईड आणि मिथेन या प्रदूषणकारी वायूंची पातळी गेले अनेक वर्षं वाढत असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांच्या अहवालात दिसून आलं आहे.    दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल २११ पर्यंत अर्थात ‘वाईट’ या श्रेणीत पोचला असून येत्या शुक्रवारपर्यंत तो ३४६ पर्यंत म्हणजेच ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत पोचण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक पावसाळा थांबल्यानंतरच्या काळात अधिक खराब झाला असून तो गेल्या आठवड्यात १५३ पर्यंत पोचला असल्याचं या अहवा...

August 26, 2025 2:38 PM

views 12

दिल्लीतल्या दर्यागंज इथं इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

दिल्लीतल्या दर्यागंज इथं इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्लीचे मुख्य सचिव, महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांना नोटीस बजावली आहे. या घटनेच्या प्रसारमाध्यमातल्या वृत्ताची दखल घेत आयोगाने या प्रकरणाचा विस्तृत अहवाल दोन आठवड्यात सादर करायला सांगितलं आहे. 

July 31, 2025 2:37 PM

views 9

लाच घेतल्याच्या आरोपावरून दिल्ली विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याला अटक

दिल्ली विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याला लाच घेतल्याच्या आरोपावरून सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली आहे.   या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून त्याच्या दुकानाच्या फ्रीहोल्ड प्रक्रियेसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावरून सापळा लावत सीबीआयने या अधिकाऱ्याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. 

July 12, 2025 8:13 PM

views 14

दिल्लीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू

दिल्लीतल्या सीलमपूर इथं आज सकाळी एक चार मजली इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. पोलीस, एनडीआरएफ आणि स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   दिल्ली सरकारचे मंत्री कपिल मिश्रा यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. इमारतीजवळची गल्ली अरुंद असल्यानं बचावकार्यात अडथळे येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्यांबद्दल समाज माध्यमांतून शोक व्यक्त केला आहे.

July 4, 2025 2:35 PM

views 4

29 व्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषदेचं दिल्लीत उद्घाटन

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांच्या हस्ते नवी दिल्लीत २९व्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषद- BES EXPO २०२५चं उद्घाटन करण्यात आलं. गेल्या दहा वर्षात देशातल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली असल्याचं सेहगल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी बोलताना म्हणाले की, लोक आता अशा टप्प्यावर पोहोचले आहेत, जिथे आशयाचं केवळ जागतिकीकरणच नव्हे तर अत्याधिक वैयक्तिकीकरण आणि अत्याधिक स्थानिकीकरण करणंही शक्य आह...

May 2, 2025 3:05 PM

views 26

देशाच्या अनेक भागात अवकाळी पाऊस, दिल्लीत पावसाचे ४ बळी

देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम आहे. तर उत्तरेकडच्या काही भागात बंगालच्या उपसागरावरुन येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमी वाऱ्यांच्या संघर्षामुळे वावटळीसदृश स्थिती निर्माण झाली आहे.  राजधानी दिल्लीत आज सकाळी वादळी वारे आणि पावसामुळे एक झाड कोसळून एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला. द्वारका इथं खाराखरी नाहर गावात झालेल्या या दुर्घटनेत एक महिला तिच्या  तीन मुलांसह मरण पावली, तर तिचा  पती जखमी झाला. दक्षिण दिल्लीतल्या  जाफरपूर कलान इथं एका घरावर झाड कोसळल्याने अनेक जण  ढिगाऱ्याखाली अडकले...

March 31, 2025 6:31 PM

views 13

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक

दिल्ली एनसीआर भागात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. अंमली पदार्थ तस्करीविरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांनी या टोळीला पकडलं असून या टोळीकडून २७ कोटी रुपयांहून जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या यशाबद्दल शहा यांनी कारवाई करणाऱ्या दलांचं कौतुक केलं आहे.

March 11, 2025 3:21 PM

views 5

दिल्लीत झोपडपट्टीला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू

दिल्लीत आनंद विहार इथं आज पहाटे झोपडपट्टीला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी आग आटोक्यात आली असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.