November 19, 2025 10:24 AM

printer

अल फलाह समूहाचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना अटक

सक्तवसुली संचालनालयानं अल फलाह समूहाचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली आहे.

 

एका वर्तमान प्रकरणाच्या चौकशीत अल फलाह समूहाच्या परिसरात केलेल्या शोध कारवाईदरम्यान गोळा झालेल्या पुराव्यांचे सविस्तर तपास आणि विश्लेषण केल्यानंतर ही अटक करण्यात आली.