प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालपासून दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नामरूप येथे 12 हजार कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहे. त्याशिवाय ब्रह्मपुत्र नदीत जहाजातून प्रवास करत पंतप्रधान स्थानिक शाळांमधील 25 विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करणार आहेत. त्यानंतर गुवाहाटीतल्या पश्चिम बोरागाव इथं नव्याने उभारण्यात आलेल्या शहिद स्मारक क्षेत्राला भेट देणार आहेत.
प्रधानमंत्र्यांनी काल पहिल्या दिवशी गुवाहाटीत लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं. जवळपास सव्वा कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेली ही इमारत एक लाख चौरस मीटरपेक्षा अधिक परिसरात पसरलेली आहे. उद्घाटनानंतर जाहीर सभेला संबोधित करताना, केंद्र सरकार आसामच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगून गेल्या 11 वर्षात राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत असं ते म्हणाले.