January 11, 2025 3:05 PM

views 24

आसाममधे कोळसा खाणींमधे आणखी एकाचा मृतदेह

आसाममधे दिमा हासो जिल्ह्यातल्या उम्रांग्सो कोळसा खाणींमधे पुराचं पाणी शिरल्यानं मृत्युमुखी पडलेल्या आणखी एका खाणकामगाराचा मृतदेह आज मदतपथकाने बाहेर काढला. केंद्रीय आणि राज्यसरकारी यंत्रणांची मदतपथकं गेले ६ दिवस कार्यरत आहेत.   गेल्या सोमवारी या रॅटहोल खाणींमधे पाणी शिरल्यानं ९ कामगार अडकले होते. यापूर्वी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. या खाणी बेकायदेशीरपणे चालवल्या जात असून या दुर्घटनेसंदर्भात आतापर्यंत २ जणांना अटक झाली आहे.

October 13, 2024 1:46 PM

views 29

आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आसाममधील भूकंपाची तीव्रता ४ पूर्णांक २ रिक्टर स्केल इतकी होती. आसामच्या मध्यवर्ती भागात भूकंपाचे केंद्र होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्या लगत असलेल्या उदलगुडी जिल्ह्यात सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपांचे धक्के जाणवले. यात कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याची अद्याप नोंद नाही. तर जम्मू-काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात पहाटे ६ वाजून १४ मिनिटांनी ४ पूर्णांक ३ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे केंद्र गुंडोह येथे...

August 15, 2024 7:50 PM

views 37

आसाममध्ये सुरक्षा दलाकडून शोध मोहिम सुरू

बंदी घालण्यात आलेल्या उल्फा या अतिरेकी संघटनेनं २४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्यानंतर आसाममध्ये सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी शोध मोहिम राबवली. राज्यातून कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही. गुवाहाटीमध्ये काही ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्या असून न्याय वैद्यक चाचणीसाठी त्या पाठवल्याची माहिती पोलीस महासंचालक जी. पी. सिंग यांनी दिली. चर्चेतून मुद्दे सोडण्याचे आवाहन मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी उल्फाला केलं आहे.

August 6, 2024 7:33 PM

views 24

केरळ आणि आसामला महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १० कोटींची मदत

केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीवित आणि वित्तहानी झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं केरळला १० कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसंच जुलै महिन्यात आसाम राज्यात पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यातून सावरण्यासाठी आसामलाही महाराष्ट्र शासनाकडून १० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

August 4, 2024 10:00 AM

views 44

आसाममधील मोरीगाव इथं 27 हजार कोटी रुपयें गुंतवणुकीनं सेमीकंडक्टरचा कारखाना

आसाममधील मोरीगाव इथं टाटाच्या सेमीकंडक्टर युनिटचे बांधकाम सुरू झालं आहे असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत याबद्दल अधिक माहिती देताना वैष्णव म्हणाले की, या एककामध्ये 27 हजार कोटी रुपयें गुंतवणूक केली जाईल आणि 15 हजार प्रत्यक्ष आणि 11 ते 13 हजार अप्रत्यक्ष नोकरीच्या संधी निर्माण होतील. या भव्य सेमीकंडक्टर कारखान्यातून दररोज चार कोटी 83 लाख सेमीकंडक्टर चिप्स तयार होणार आहेत. या चिप्सचा वापर ईलेक्टीक वाहनं, दळणवळण आणि संजालांच्या पाया...