डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबईसह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस

महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि झारखंडमधे सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होत आहे.

 

महाराष्ट्रात मोसमी पावसाचं आगमन  नेहमीच्या वेळेच्या १० दिवस आधीच झालं असून कोकणात सर्वत्र तसंच सोलापूर, सांगली इत्यादी ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे.

 

राजधानी मुंबईत कालपासून वादळी पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. सकाळी कार्यालयात जाणाऱ्या नोकरदारांचे त्यामुळे हाल झाले. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमधे मुसळधारपावसामुळे नद्या भरुन वाहू लागल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे काही दिवस  जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

 

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासनानं सतर्क राहून मदत कार्य करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसंच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसंच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनानं वेळेवर आणि प्रभावीपणे कार्य करावे असे निर्देश त्यांनी दिले. या परिस्थितीवर शासनाचं लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.