हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला तात्पुरता आदेश जारी

अमेरिकेतल्या बोस्टन इथले जिल्हा न्यायाधीश ॲलिसन बरोज यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला दुसरा तात्पुरता आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परदेशी विद्यार्थ्यांना, यासंदर्भातला कायदेशीर खटला सुरू असेपर्यंत हार्वर्डमध्ये शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. या आदेशानं हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापासून रोखण्याचा ट्रम्प प्रशासनाचा आणखी एक प्रयत्न रोखला गेला आहे.