January 22, 2026 1:36 PM

views 64

ग्रीनलँडवर नियंत्रणासाठी बळाचा वापर करणार नाही- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

ग्रीनलँडवर नियंत्रणासाठी बळाचा वापर करणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे मात्र आर्क्टिक बेटाची मालकी वॉशिंग्टनकडे द्यावी या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला आहे. दावोसमध्ये आर्थिक मंचाच्या परिषदेला संबोधित करताना ग्रीनलँडच्या अधिग्रहणासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने वाटाघाटी करू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अर्धस्वायत्त प्रदेश आहे. ग्रीनलँडने मात्र अमेरिकेचा भाग होण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. मात्र या बेटावर आधीपासूनच एक लष्कर...

January 18, 2026 3:18 PM

views 17

युरोपीय नेत्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरच्या प्रस्तावित करांचा निषेध

युरोपीय नेत्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरच्या प्रस्तावित करांचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधले संबंध बिघडतील आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे दिला आहे. प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व ही आंतरराष्ट्रीय कायद्याची मूलभूत तत्त्व असून, आंतरराष्ट्रीय कायद्याचं रक्षण करण्यासाठी युरोपियन युनियन संयुक्त प्रति...

January 18, 2026 10:08 AM

views 46

आठ युरोपीय देशांतील वस्तूंवर १० टक्के आयात शुल्क लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ युरोपीय देशांचा ग्रीनलँडवरील नियंत्रणाला विरोध असल्याचं कारण देत त्या देशांतील वस्तूंवर १० टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम, नेदरलँड्स आणि फिनलंड या देशांना हे शुल्क फेब्रुवारीपासून लागू होईल असं समाज मध्यमावरील पोस्ट मध्ये ट्रम्प यांनी म्हंटलं आहे.  अमेरिकेकडून ग्रीनलँडची संपूर्ण खरेदी म्हणून वर्णन केलेल्या करारावर सहमती  झाली नाही तर १ जूनपासून हा कर २५ टक्क्यांपर्यंत वाढवला ...

January 8, 2026 1:42 PM

views 59

जगभरातल्या ६० हून अधिक संस्थांच्या सदस्यत्वातून अमेरिकेची माघार

जगभरातल्या ६० हून अधिक संघटनांमधलं अमेरिकेचं सदस्यत्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केलं आहे. या संस्था कालबाह्य आणि अमेरिकेच्या हिताच्या विपरीत असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. यातल्या ३१ संस्था संयुक्त राष्ट्रांच्या आणि ३५ इतर आहेत. यामध्ये Intergovernmental Panel on Climate Change, UN Department of Economic and Social Affairs, UN Population Fund, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा यांचा समावेश आहे. 

December 20, 2025 1:17 PM

views 32

औषधांच्या दरात कपात करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचा ९ औषध उत्पादक कंपन्यांबरोबर करार

ठराविक औषधांच्या दरात कपात करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नऊ औषध उत्पादक कंपन्यांबरोबर नवीन करार केले आहेत. या करारानुसार या कंपन्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या  नवीन औषधांची  सर्वाधिक पसंतीच्या देशांच्या किंमतीप्रमाणे दरनिश्चिती केली जाईल. विशेषतः वैद्यकीय विमाधारक नसलेल्या रुग्णांना लाभ मिळावेत यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. 

November 18, 2025 7:16 PM

views 39

ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्रस्तावाला UNSC ची मंजुरी

गाझामध्ये शांतता पुनर्स्थापित करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं मंजूर केला. १५ पैकी १३ सदस्यांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं, तर रशिया आणि चीन या देशांनी मतदानात भाग घेतला नाही. ट्रम्प यांच्या या प्रस्तावांतर्गत आंतरराष्ट्रीय स्थैर्य दलाची नियुक्ती केली जाईल आणि शस्त्रसंधीच्या दिशेनं पुढची दिशा ठरवण्यात येईल. हमासनं शस्त्रं टाकणं आणि पॅलेस्टाईनच्या तंत्रज्ञांची संक्रमण समिती स्थापन करणं यांचाही या प्रस्तावात...

November 3, 2025 2:44 PM

views 59

अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करणार असल्याचा अमेरिकेचा इशारा

रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. त्यामुळे अमेरिकाही अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. काल एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं. जेव्हा इतर देश चाचण्या करत असतात तेव्हा चाचणी थांबवणारा अमेरिका हा एकमेव देश नसावा, असंही सुतोवाच त्यांनी केलं. ३० वर्षांपेक्षा जास्त काळानंतर अमेरिका अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करण्याची ट्रम्प यांनी घोषणा केली. रशियाने अलीकडेच केलेल्या प्रगत अण्वस्त्र-सक्षम प्रणालीं...

October 28, 2025 9:35 AM

views 170

डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीवर टीका

रशिया आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणीची केलेली घोषणा योग्य नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.  रशियाने त्यांच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बुरेव्हेस्टनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचं पुतीन यांनी सांगितलं. जगातल्या इतर कोणत्याही देशाकडे नसलेली ही यंत्रणा लष्करी सेवेत  आणण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा तयार करण्याची तयारी करण्याचे आदेश त्यांनी रशियाच्या लष्कर...

October 19, 2025 10:42 AM

views 172

अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात नागरिक रस्त्यावर

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कारभार आणि धोरणांचा निषेध करण्यासाठी देशाच्या विविध भागातले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अटलांटा, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क इथं मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. ट्रंप यांच्या हुकुमशाही कारभारामुळे अमेरिकी लोकशाही धोक्यात आली असल्याचं निदर्शकांचं म्हणणं आहे. स्थलांतरीतांविरुद्ध उगारलेला बडगा, आरोग्यसेवेच्या तरतुदीत कपात आणि रस्त्यांवर सुरक्षा दलांची नेमणूक ह्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ट्रंप विरोधी नेत्यांनी मात्र नागरिकांना शांततापूर्ण नि...

October 14, 2025 1:18 PM

views 80

गाझा पट्टीतला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या

गाझा पट्टीत गेली दोन वर्ष सुरु असलेला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प, इजिप्त आणि तुर्कीएचे अध्यक्ष आणि कतारचे अमीर यांनी काल इजिप्त मध्ये शर्म अल-शेख इथं स्वाक्षरी केली. यावेळी ३०पेक्षा जास्त देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.     या शांतता शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,  इजिप्तचे अध्यक्ष  अब्देल-फत्ताह अल-सिसी, तुर्कीएचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी, यांनी हमास-इ...