डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हावर्ड विद्यापिठाच्या अनुदानावर विपरित परिणाम होण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकी सरकारच्या मागण्या मान्य न केल्यास हावर्ड विद्यापिठाला देण्यात येणाऱ्या अनुदानावर विपरित परिणाम होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. ट्रंप प्रशासनाने या संस्थेसाठी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी गोठवण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेतील सर्वात जुन्या विद्यापीठाला भरती, प्रवेश आणि अध्यापन पद्धतींमध्ये बदल करण्याची मागणी प्रशासनानं केली आहे. दरम्यान हार्वर्ड विद्यापीठानं प्रशासनाच्या मागण्या नाकारल्या असून व्हाईट हाऊसवर त्यांच्या संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.