ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं बुद्धिबळ या खेळातलं चीनचं वर्चस्व मोडीत काढलं याबद्दल एक भारतीय म्हणून तिचा अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुख हिचा आज नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते. तीन कोटी रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी चेस असोसिएशनतर्फेही दिव्या देशमुखला ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनीही दिव्या हिच्या निवासस्थानी भेट देऊन तिचा गौरव केलं.