August 12, 2025 2:32 PM

views 46

जागतिक वेगवान बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख उपांत्य फेरीत दाखल

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या महिला वेगवान  बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने चीनच्या लेई टिंगजीला १०-३ असं हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दिव्याने नुकतीच जॉर्जिया इथं झालेली  फिडे विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला होता. उपांत्य फेरीत येत्या गुरुवारी तिचा मुकाबला चीनची ग्रँडमास्टर हाउ यीफान हिच्याशी होणार आहे.

August 3, 2025 10:07 AM

views 24

ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाकडून सत्कार-तीन कोटी रुपये पारितोषिक प्रदान

बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा काल नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार करण्यात आला.   दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळवलेलं देदीप्यमान यश हे देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दिव्याला तीन कोटी रुपये बक्षीस सरकारकडून प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही दिव्...

August 2, 2025 8:28 PM

views 23

विश्वचषक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुखचा सत्कार

ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं बुद्धिबळ या खेळातलं चीनचं वर्चस्व मोडीत काढलं याबद्दल एक भारतीय म्हणून तिचा अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुख हिचा आज नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते. तीन  कोटी रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी चेस असोसिएशनतर्फेही दिव्या देशमुखला ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.    सरन्यायाधीश न्...

July 31, 2025 7:23 PM

views 50

बुद्धीबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुखला ३ कोटी रुपयांचं बक्षीस

बुद्धीबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुख हिला ३ कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तिच्या प्रशिक्षकांना ३० लाख रुपये दिले जाणार आहेत. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला. येत्या शनिवारी नागपूरमध्ये तिचा सत्कार केला जाणार आहे. भारताच्या कोनेरु हंपीला अंतिम फेरीत पराभूत करुन तिनं विश्वचषकात विजय मिळवला होता.

July 28, 2025 7:42 PM

views 31

FIDE Chess World Cup : दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती

भारताची दिव्या देशमुख हिनं फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरलं आहे. जॉर्जियाच्या बाटुमी इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं भारताच्याच हंपी कोनेरू हिच्यावर अटीतटीच्या टायब्रेकमध्ये एका गुणानं मात केली. या यशाबरोबरच दिव्या ही भारताची ८८वी ग्रँडमास्टर ठरली आहे. हंपी कोनेरू, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांच्यानंतरची ही कामगिरी करणारी ती चौथी महिला ग्रँडमास्टर आहे. विश्वचषक पटकावल्यानंतर आता ती महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या जू वेंजून हिला आव्हान देईल. मूळच्या ...

July 24, 2025 1:05 PM

views 50

दिव्या देशमुख FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

जॉर्जियात बटुमी इथं सुरु असलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत   काल भारताच्या दिव्या देशमुखनं चीनच्या टॅन झोंगी हिला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवलं.पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून, दिव्यानं २०२६ मध्ये होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेतही स्थान मिळवलं आहे आणि तिचा पहिला ग्रँड मास्टर निकषही पार केला आहे. १९ वर्षांची दिव्या फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीत कोेनेरु हम्पी आणि ली टिंगजी यांच्...

June 14, 2024 10:19 AM

views 69

भारताची बुद्धीबळपटू दिव्या देशमुख नं जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत पटकावलं विजेतेपद

भारताची बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिनं कनिष्ठ गटातील मुलींच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं काल झालेल्या अंतिम फेरीत तिनं बल्गेरियाच्या बेलोस्लावा क्रास्तेव्हा हिचा केवळ २६ चालीत पराभव केला. दिव्याचं जागतिक स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे. दिव्यानं या स्पर्धेत ११ पैकी ९ सामने जिंकले तर दोन सामने बरोबरीत सोडवले.