डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिल्ली आणि मुंबईच्या हवेत प्रदूषणकारी वायूंच्या पातळीत वाढ

दिल्ली आणि मुंबईच्या हवेतली कार्बन डायॉक्साईड आणि मिथेन या प्रदूषणकारी वायूंची पातळी गेले अनेक वर्षं वाढत असल्याचं आयआयटी मुंबईच्या संशोधकांच्या अहवालात दिसून आलं आहे. 

 

दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल २११ पर्यंत अर्थात ‘वाईट’ या श्रेणीत पोचला असून येत्या शुक्रवारपर्यंत तो ३४६ पर्यंत म्हणजेच ‘अतिशय वाईट’ या श्रेणीत पोचण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक पावसाळा थांबल्यानंतरच्या काळात अधिक खराब झाला असून तो गेल्या आठवड्यात १५३ पर्यंत पोचला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.