CSMI विमानतळावर जप्तीच्या प्रकरणात चौघांना अटक

मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्तीच्या तीन मोठ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक केली. जप्तीमध्ये गांजा, तस्करी केलेले जीवंत आणि मृत वन्यजीव, आणि सोने यांचा समावेश असून, याची एकत्रित किंमत ११ कोटी रुपयांहून अधिक आहे. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे नऊ किलो गांजा, तर दुसऱ्या प्रवाशाकडून तीन प्रजातींचे ३० जीवंत तर १४ मृत वन्यजीवांचे नमुने आढळले. तर तिसऱ्या घटनेत दुबईहून येणाऱ्या दोन प्रवाशांकडून सुमारे दीड किलो सोनं जप्त करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.