कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीतून देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १०व्या स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री बोलत होते.